Jump to content

आमूर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आमुर नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
आमूर
Аму́р, 黑龙江
वेर्खनाया एकोन, खबारोव्स्क क्राय, रशिया येथील आमूर नदीचे पात्र
आमूर नदीच्या मार्गाचा नकाशा
मुख ओखोत्स्कचा समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश चीन, रशिया
लांबी २,८२४ किमी (१,७५५ मैल)
सरासरी प्रवाह ११,४०० घन मी/से (४,००,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १८.५५ लाख

आमूर (रशियन: Аму́р, चिनी: 黑龙江, हैलोंग च्यांग) ही पूर्व आशियामधील एक प्रमुख नदी आहे. आमूर नदी रशियाचीन देशांच्या सीमेजवळ आर्गुन व शिल्का ह्या दोन प्रमुख नद्यांच्या संगमामधून निर्माण होते. रशिया व चीनची आग्नेय सीमा आमूरवरूनच आखली गेली आहे. तेथून आमूर पूर्वेकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन साखालिन बेटाजवळ प्रशांत महासागराला मिळते. एकून २,८२४ किमी लांबीची आमूर ही जगातील दहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.

खबारोव्स्क हे आमूरवरील प्रमुख शहर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]


विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत