आमटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आमटीसाठी कढईत किंवा पातेल्यात, गोडे तेल तापवून वर मोहरी किंवा जिरे टाकून फोडणी करतात.मोहरी तडतडल्यावर त्यात हळद,तिखट टाकतात.त्यात तुरीची किंवा मुगाची डाळ शिजवून तयार केलेले वरण टाकतात. आमटी जितकी पातळ हवी तितके पाणी टाकतात. मग मीठ, चिंचेचा कोळ/आमसूल/आमचूर, गूळ, ओले खोबरे, मसाल्याची पूड इत्यादींपकी काही किंवा सर्व जिन्नस चवीप्रमाणे टाकून भरपूर उकळले की तयार होणाऱ्या खाद्यपदार्थाला आमटी/फोडणीचे वरण म्हणतात.