आनाबासिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनाबासिस हा झेनोफन या ग्रीक इतिहासकाराचा एक ग्रंथ आहे.

दुसऱ्या डरायसच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा किरॉस द यंग याने आर्टक्सर्क्सीझ या आपल्या भावाला राज्यपदावरून खाली खेचण्यासाठी जी मोहीम आरंभिली, तिचा इतिहास या ग्रंथात सांगितलेला आहे. काही राजकीय कारणांमुळे झेनोफनला हा ग्रंथ सिसिलीमधील सिराक्यूस येथे थेमिस्टॉगेनिझ याच्यामार्फत प्रसिद्ध करावा लागला असे दिसते. या ग्रंथाचे एकूण सात भाग आहेत.

किरॉस द यंगचा विषय त्यांतील पहिल्याच भागात असून उरलेल्या भागांत ग्रीक लष्करासंबंधी माहिती आहे. किंबहुना हाच त्याच्या ग्रंथाचा मुख्य विषय होय. पर्शियन लष्करापेक्षा ग्रीक लष्कर श्रेष्ठ होते, असे झेनोफनने या ग्रंथात दाखविले आहे.

आरिआनॉसने (सु. ९५ – सु. १७५) अलेक्झांडरविषयी लिहिलेल्या आपल्या इतिहासग्रंथासही आनाबासिस हेच नाव दिले आहे कारण आपला हा ग्रंथ झेनोपनच्या आनाबासिसचा उत्तरार्धच होय, असे त्याचे मत होते.