आगमुदैयन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आगमुदैयन ही तमिळनाडू राज्यातील एक जात आहे. त्यांच्यात रूढ असलेल्या एका लोककथेनुसार अहल्येला इंद्रापासून जे तीन मुलगे झाले, त्यांपासून मरवन, कल्लन व आगमुदैयन या तीन जातींची उत्पत्ती झाली. आगमुदैयनांपैकी ज्या लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले, त्यांची गणना वेळ्ळाळ जातीत होऊ लागली. आगभुदैयन लोक मुख्यत: शेती करतात. आयनार, पिडारी व करुपण्णस्वामी यांसारख्या ग्रामदेवतांची पूजा करतात. लग्न लावण्यासाठी ते ब्राह्मण उपाध्याय वापरतात.

संदर्भ[संपादन]

  • मराठी विश्वकोश