आंत्रिविषार (पशुरोग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंत्रिविषार हा विशेषत: शेळ्या मेंढ्या इत्यादी वर्गातील जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा रोग 'क्लॉस्ट्रीडियम परफिन्जीस (प्रकार-डी)' या विषाणूंमुळे होतो.हा महाभयंकर रोगात गणल्या जातो.

लागण[संपादन]

या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या आतड्यात वास्तव्य करून असतात.दूषित खाद्य किंवा/व दूषित पाण्याद्वारे या रोगाचे संक्रमण होते.याचे जंतू पोटात जाऊन जनावराचे आतड्यात एक प्रकारचे विष निर्माण करतात.त्याने हा रोग फैलावतो.

लक्षणे[संपादन]

असे हे आतड्यात तयार झालेले विष मग संपूर्ण शरीरात पसरते.या विषबाधेमुळे चरावयास गेलेल्या मेंढ्या/शेळ्या अचानक मलूल व सुस्त होतात. त्यांना पातळ हागवण लागते.क्वचित आतड्याच्या दाहामुळे रक्तमिश्रित हगवण पण होते.याचे प्रमाण वाढल्यास व विष शरीरात भिनल्यामुले त्या तडकाफडकी दगावतात.या रोगामुले मेंढ्यांना नीट उभे राहता येत नाही. त्यांचे डोळे ताणल्या जातात.त्यांचे पोटात सारख्या कळा येतात त्यामुळे त्या सतत पाय झाडतात व बेशुद्धही पडतात.

मेंढ्यांची ४ ते ६ आठवडे वयाची पिल्ले यांना बाधा लवकर होते व ती लवकर मृत्युमुखी पडतात.

प्रतिबंधक उपाय[संपादन]

पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रोगाची प्रतिबंधक लस जनावरांना टोचून घ्यावी

हेही बघा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]