आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवस हा ३१ मार्च रोजी होणारा वार्षिक कार्यक्रम आहे [१][२] पारलिंगी लोकांचे स्तवन करण्यासाठी आणि जगभरातील पारलिंगी लोकांवर होणाऱ्या भेदभावाबद्दल आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी उत्सव आहे. हा दिवस अमेरिकेतील पारलिंगी कार्यकर्त्याने [३] २००९ मध्ये मिशिगनच्या [४] पारलिंगी लोकांना एलजीबीटी समुदायात मान्यता नसल्याची प्रतिक्रिया म्हणून, आणि एकुलता ख्यातनाम पारलिंगी-केंद्रित दिवस होता पारलिंगी स्मरण दिन होता, जेंव्हा पारलिंगी लोकांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला जातो, परंतु या दिवशी पारलिंगी समाजातील जिवंत सदस्यांची ओळखीचा अभिस्वीकार केला जात नाही आणि त्यांचे स्तवन केले जात नाही. ३१ मार्च २००९ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्याता दिवस आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे नेतृत्व अमेरिकेतील युवा वकिली संस्था ट्रान्स स्टूडेंट एज्युकेशनल रिसोर्सने केले आहे .[५]

२०१४ मध्ये, हा दिवस जगभरातील कार्यकर्त्यांद्वारे पहिल्यांदा साजरा करण्यात आला — यामध्ये आयर्लंड [६] आणि स्कॉटलंड चा पण समावेश होता.[७]

२०१९ दिया दे ला व्हिसीबिलीडाड ट्रान्स, कार्ताहेना, कोलोंबिया
३१ मार्च,२०१४ रोजी आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवशी पारलिंगी म्हणून जाहीर करण्यासाठी न्यू यॉर्क शहरातील टेड कॉन्फरन्समध्ये मनिला-मधील सुपरमॉडेल गीना रोसेरो हिची भूमिका होती.

सामाजिक माध्यमे[संपादन]

२०१५ मध्ये बऱ्याच पारलिंगी व्यक्तींनी फेसबुक, ट्विटर, टंबलर आणि इंस्टाग्राम यासह इतर वेबसाइट्सवरील ऑनलाइन सामाजिक माध्यम मोहिमेमध्ये भाग घेतला. जागरूकता वाढविण्यासाठी आणि दृश्यमानता वाढविण्यासाठी सहभाग्यांनी सेल्फी, वैयक्तिक कथा आणि पारलिंगी समस्यांशी संबंधित आकडेवारी आणि इतर संबंधित सामग्री पोस्ट केली.[८]

आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवस साजरा करण्यासाठी दोन पारलिंगी झेंडे असलेले स्टारबक्स

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Nenshi proclaims Trans Day of Visibility". Canadian Broadcasting Corporation. April 4, 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Today is International Transgender Day of Visibility". Human Rights Campaign. 31 March 2014. Archived from the original on 2018-09-11. 18 January 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "A time to celebrate". The Hamilton Spectator. 27 March 2014. 31 March 2014 रोजी पाहिले.
  4. ^ Carreras, Jessica. "Transgender Day of Visibility plans erupt locally, nationwide". PrideSource. Archived from the original on March 27, 2013. April 3, 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-12-02. 2021-03-31 रोजी पाहिले.
  6. ^ "Trans* Education & Advocacy Protest RTE March 31st". Gaelick. 31 March 2014. Archived from the original on April 3, 2014. 31 March 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "Twitter / The_SSP_: The SSP stands in solidarity ..." 31 March 2014. 31 March 2014 रोजी पाहिले.
  8. ^ "These Trans People Are Taking Selfies To Celebrate Transgender Day Of Visibility". BuzzFeed LGBT. 31 March 2015. 18 January 2016 रोजी पाहिले.

 

बाह्य दुवे[संपादन]