Jump to content

आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



२०२० मध्ये सुधारलेली अधिकृत आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिह्नमाला सारणी

आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिह्नमाला (आयपीए) मुख्यत: लॅटिन लिपीवर आधारित ध्वन्यात्मक संकेतांची एक वर्णमाला प्रणाली आहे. हे लिखित स्वरूपात भाषण ध्वनींचे प्रमाणित प्रतिनिधित्व म्हणून १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक संघटनेने तयार केले होते.[] आयपीएचा वापर शब्दकोषशास्त्रज्ञ, परदेशी भाषेचे विद्यार्थी आणि शिक्षक, भाषाशास्त्रज्ञ, बोली भाषा शास्त्रज्ञ, गायक, अभिनेते, कृत्रिम भाषा निर्माते आणि भाषांतरकारांद्वारे केला जातो.[][]

आयपीएची भाषेच्या अशा गुणांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निर्मित केले गेले आहेत जे बोली भाषेत शब्दगत ध्वनी आहेत: ध्वनी, स्वनिम, सुरयोजन आणि शब्दांचे आणि अक्षरांचे विभाजन.[] दात गळणे, तोतडेपणा, आणि खंडोष्ठ आणि खंडतालु यांचे प्रतिदर्शन करण्या साठी विस्तारित आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिह्नमाला वापरता येऊ शकते []

आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिन्हे अक्षरे आणि उच्चारभेदक चिह्न या दोन मूलभूत प्रकारांपैकी एक किंवा अधिक घटकांचे बनलेले आहेत. उदाहरणार्थ मराठी अक्षर 'ट' याचे प्रतिदर्शन [ʈ] या चिन्हाने केले जाते पण 'ठ' याचे प्रतिदर्शन [ʈʰ] हे अक्षर आणि उच्चरभेदक चिन्हाचे संयोग करून केले जाते. तिरप्या रेषेचा उपयोग स्वनिमिक प्रतिलेखन प्रतिदर्शीत करण्यासाठी केला जातो; अशा प्रकारे इंग्रजी अक्षर <t>चे प्रतिलेखन /t/ हे एकतर [t̺ʰ] किंवा [t] पेक्षा अधिक अमूर्त आहे आणि संदर्भ आणि भाषेनुसार कोणतेही उच्चरण घेऊ शकते.

कधीकधी आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक संघटनेद्वारे अक्षरे किंवा उच्चरभेदक चिन्हे जोडले जातात, काढले जातात किंवा सुधारित केले जातात. २००५ मध्ये सर्वात अलीकडील बदलानंतर, [] आयपीएमध्ये १०७ खंडीय अक्षरे, अनिश्चितपणे मोठ्या संख्येने अधिखंडीय अक्षरे, ४४ उच्चारभेददर्शक (संयुक्त उच्चारभेददर्शक न मोजता) आणि चार अतिरिक्त-कोशगत छंदःशास्त्रीय चिन्हे आहेत. यापैकी बरेच सध्याच्या खाली या लेखात चार्टमध्ये आणि आयपीएच्या वेबसाइटवर दर्शविल्या आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b International Phonetic Association (IPA), Handbook.
  2. ^ a b MacMahon, Michael K. C. (1996). "Phonetic Notation". In P. T. Daniels; W. Bright (eds.). The World's Writing Systems. New York: Oxford University Press. pp. 821–846. ISBN 0-19-507993-0.
  3. ^ Wall, Joan (1989). International Phonetic Alphabet for Singers: A Manual for English and Foreign Language Diction. Pst. ISBN 1-877761-50-8.
  4. ^ "IPA: Alphabet". Langsci.ucl.ac.uk. 10 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "Full IPA Chart". International Phonetic Association. 24 April 2017 रोजी पाहिले.