अशोक बेंडखळे
Appearance
अशोक बेंडखळे हे एक मराठी लेखक, समीक्षक व संपादक आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, नवशक्तीसारख्या दैनिक नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे स्तंभलेखन व इतर सदरे लिहिली केले.
बेंडखळे ह्यांनी २४हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. 'साहित्य' या दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत.
पुस्तके
[संपादन]- अभिनयसम्राट दिलीपकुमार : चरित्र आणि चित्रपट
- इये मराठीचिये नगरी (भाषाविषयक)
- ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
- ऐतिहासिक महाड
- क्रांतिवीर भगतसिंह (चरित्र)
- निकोबारच्या लोककथा (अनुवादित, मूळ लेखक - राॅबिन राॅयचौधुरी)
- निवडक पिंगे (संपादित)
- पत्र वृतान्त (मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास)
- बखर एका पांडुरंगाची (पांडुरंग परांजपे नावाच्या अल्पपरिचित माणसाचे व्यक्तिचित्रण)
- बिनचेहऱ्याची माणसे (व्यक्तिचित्रणे)
- महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ चरित्रांची मालिका) (आनंदीबाई कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले)
- माणसं मनातली
- २६/११ ची शौर्यगाथा
पुरस्कार
[संपादन]- बेंडखळे यांना नऊ साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, त्यांमध्ये डॉ. सी. डी. देशमुखांवरील पुस्तकाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) आणि २००० सालच्या बाल साहित्य पुरस्काराचा समावेश आहे.