अल्गोरिदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवा पेटवण्याच्या चाचणीचा अल्गोरिदम दर्शवणारा फ्लोचार्ट

अल्गोरिदम म्हणजे एखादे काम करण्याची पायरीगणिक वाटचाल सांगणारी कार्यसूची होय. संगणकाला एखादे कार्य करावयाला दयायचे असल्यास त्याने ते काम कोणत्या क्रमाने करावे जेणेकरून हवे ते उत्तर तो योग्य आणि अचूक देईल याची यादी म्हणजे अल्गोरिदम असे म्हणता येईल. गणित आणि संगणकविज्ञान या विषयांत अल्गोरिदम म्हणजे क्रमवार कार्यसूची जी इच्छित कार्य पूर्ण करण्यास उपयोगी पडते. यासाठी निश्चित सुरुवात आणि शेवट माहीत असावा लागतो.

इतिहास[संपादन]

"अल्गोरिदम" हा शब्द इ.स.च्या ९ व्या शतकातील पर्शियन गणिती "अबू अब्दुल्ला मुहम्मद बिन मुसा अल-ख्वारिझ्मी" यापासून आलेला आहे. "अल्गोरिझम" (रोमन: Alogrism) म्हणजे हिंदू-अरबी अंक वापरून गणित करण्याचे नियम. परंतु इ.स.च्या १८ व्या शतकात या शब्दाची व्याप्ती वाढून तो युरोपिअन-लॅटिन भाषांतराप्रमाणे अल्गोरिदम असा झाला आणि गणिताशिवाय इतर विषयांतही या शब्दाचा वापर वाढला.

पहिला अल्गोरिदम इ.स. १८४२ सालामध्ये संगणकासाठी एडा बायरोन यांच्याकडून बॅबेजाच्या ऍनालिटिकल इंजिनासाठी लिहिला गेला.