अर्विन मॅकस्वीनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्विन ब्रुस मॅकस्वीनी ( ८ मार्च १९५७, वेलिंग्टन) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने १९८० च्या दशकात रिचर्ड हॅडलीच्या क्रिकेट संघातून १६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले.त्यात तो यष्टीरक्षक व फलंदाज राहिला.त्याने कधीही कसोटी सामने खेळले नाहीत.

आंतरराष्ट्रीय सामने[संपादन]

त्याने सन १९८४-८५ मध्ये तरुण न्यू झीलँड संघासमवेत झिंबाब्वेचा दौरा केला व न्यू झीलँड वरिष्ठ संघासोबत सन १९८५-८६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा व नंतर श्रीलंका व शारजाचा दौरा केला.

इतर कर्तुत्व[संपादन]

मॅकस्वीनी १९७९ ते १९९३-९४ दरम्यान सेंट्रल डिस्ट्रिक्टस आणि वेलिंग्टन यांच्यासाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळला. १९८५-८८ च्या दरम्यान वेलिंग्टनसाठी (सेंट्रल डिस्ट्रिक्टस विरुद्ध) त्याची सर्वोच्च धावसंख्या २०५ होती तर त्याने गॅव्हीन लार्सनबरोबर पाचव्या विकेटसाठी ३४१ धावा जोडल्या होत्या.तो १९८२-८३ आणि १९८३-८४ मध्ये तसेच, १९८८ ते १९९०-९१ यादरम्यान वेलिंग्टनचा कर्णधार होता. तो 'हॉक कप' साठी हॉक बे मार्फत खेळला होता.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.