अर्थिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इलेक्ट्रिकल अर्थिंगसाठी जमिनीमध्ये साधारणत: ५ ते ८ फुटांपर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक १’x१’ आकारमानाची १’’ जाडीची तांब्याची किंवा बिडाची प्लेट बसवितातव व. त्या प्लेटच्या सभोवताली कोळसा, मीठ, अर्थिंग पावडर टाकतात, व खड्डा भरून टाकततात. या क्रियेस ‘अर्थिग’ करणे असे म्हणतात.जमिनीमध्ये पुरलेल्या प्लेटपासून तांब्याची एक जाड तार बाहेर काढलेली असते. या तारेस ‘अर्थिगची तार’ म्हणतात. अर्थिग केलेल्या जागेच्या आसपास ओलावा राहील, अशी खबरदारी घेतली जाते. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या धातूच्या भागास शॉक बसू नये. याकरिता उपकरणांच्या धातूच्या भागास अर्थिग करतात. म्हणजे जमिनीतील अर्थिगपासून निघालेली तांब्याची तार उपकरणाच्या धातूच्या बाह्य भागास जोडली जाते. त्यासाठी उपकरणाला वीज पुरवणाऱ्या इलेक्ट्रिक प्लगमध्ये 'लाईव्ह' आणि “न्यूट्रल'खेरीज एक तिसरी जाड पिन असते. काही वेळा उपकरणांच्या धातूच्या भागाशी अपघाताने कनेक्शनची वायर चुकून थोडासा स्पर्श करते. अश्या वेळेस 'प्यूज' जाऊन वीजप्रवाह खंडित होतो, आणि अपघात टळतो. लाईव्ह वायर आणि अर्थिंग वायर यांच्यामधील व्होल्टेजचा फरक २ व्होल्टपेक्षा जास्त असू नये, अशी काळजी घेतली जाते.

अर्थिंग चे प्रकार[संपादन]

पाईप अर्थिंग[संपादन]

या प्रकारामध्ये पाईप चा उपयोग करतात.लोखंडी पाईप (जीआय पाईप) खड्ड्यात खोडाला जातो आणि त्यात जाड कोळसा आणो जाड मीठ याचा वापर केला जातो.जस त्या प्लेट मधेच असत पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून हे मुख्य स्विचला जोडलेले आहे.

प्लेट अर्थिंग[संपादन]

कोणत्याही धातुच्या मशीन किंवा उपकरणाच्या धातुच्या भागावर वायर जोडण्याद्वारे आपण त्याला पृथ्वी प्लेट आणि पृथ्वी इलेक्ट्रोडसह जोडतो, याला अर्थिंग किंवा ग्राउंडिंग म्हणतात.अर्थ प्लेट किंवा पृथ्वी इलेक्ट्रोडसाठी आम्ही खूप जाड वायर वापरतो ज्यास प्रतिकार कमी असतो.

अर्थिंग का करतात[संपादन]

 • जेव्हा विद्युत वाहक (थेट वायर) कंडक्टर (उदा. इस्त्री, कुलर, फॅन, वॉशिंग मशीन, टेबल दिवा, इलेक्ट्रिकल हेअर रिमूवर, गिझर) धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या भागाशी जोडलेला असतो तेव्हा इलेक्ट्रिक शॉक येतो. घरे, कारखाने, छोटी दुकाने वैज्ञानिकदृष्ट्या अर्थपूर्ण आहेत जेणेकरून दुर्घटनेला धक्का बसू नये.
 • कमी विद्युतीय दाबाच्या प्रतिरोधक सामग्रीसह वीज नेहमीच वाहते 2. ग्राउंड व्होल्टेज 0 (शून्य) असे गृहित धरले जाते. म्हणूनच, विजेला गळती, मनुष्याला विद्युत शॉक होण्यापूर्वी, पृथ्वीच्या तारामधून जमिनीवर जाते आणि पुढील अपघात टाळले जातात.

गरज[संपादन]

लाईव्ह वायरचा स्पर्श झालेल्या धातूच्या भागामधून, तो एक वाहक असल्याकारणाने प्रवाह वाहतो, या स्थितीमध्ये चुकून जरी अशा भागास माणसाचा किंवा जनावराचा स्पर्श झाला; तरी त्याला विजेचा शॉक बसतो. जर अशा उपकरणांना अर्थिग केलेले असेल, तर हा प्रवाह चटकन अर्थवायरमार्गे जमिनीत वाहून डेड (निकामी) होतो. असा प्रवाह जास्त असल्यास ताबडतोब फ्यूजही जातो. सुरक्षिततेकरिता, विजेवर चालणारी जी उपकरणे धातूची असतात, त्यांना अर्थिग करण्याची आवश्यकता असते.

अर्थिंग करताना[संपादन]

 1. बिल्डिंगच्या बाहेर बिल्डिंगपासून कमीत कमी दीड मीटर अंतर ठेवून अर्थिंग करतात..
 2. अर्थिंगसाठी वापरलेला इलेक्ट्रोड, कंडक्टर,नट-बोल्ट वॉशर्स सर्व एकाच धातूचे वापरतात..
 3. सर्किटमधून वाहणाऱ्या करंटच्या दुप्पट करंट वाहून नेईल एवढ्या जाडीची अर्थ वायर वापरलेली असते.
 4. घरगुती वायरिंगमध्ये १४ गेजची कॉपर वायर व पॉवर वायरिंगमध्ये ८ अथवा १० गेजची जी.आय.वायर वापरतात.
 5. मीठ क्षारयुक्त असल्यामुळे त्यामधून करंट लवकर वाहतो, म्हणून अर्थिंगच्या खड्ड्यात मीठ टाकलेले असते..
 6. लोणारी कोळशामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते, म्हणून मिठाबरोबर त्याचाही वापर होतो.
 7. अर्थिंगचा विरोध ५ ओहमपेक्षा जास्त असू देत नाहीत, असल्यास काॅम्प्युटर चालवण्यास अडचण येते.

संदर्भ[१][२][३][संपादन]

 1. ^ "Learning While Doing". learningwhiledoing.in. 2020-03-29 रोजी पाहिले.
 2. ^ "भूसम्पर्कन". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-04-27.
 3. ^ "Earthing system". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-03-30.