अरुण जेटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरूण जेटली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अरुण जेटली
Arun Jaitley, Minister.jpg
जन्म २८ डिसेंबर १९५२;
नवी दिल्ली
मृत्यू २४ ऑगस्ट २०१९
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.कॉम. एल्‌एल.बी.
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
जोडीदार संगीता जेटली
अपत्ये रोहन,सोनाली.


अरुण जेटली (जन्म: डिसेंबर २८, इ.स. १९५२ मृत्यू: इ.स.२०१९ ऑगस्ट २४,) हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. इ.स. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. जून ३, इ.स. २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.[१]

वैयक्तिक जीवन[संपादन]

१९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली. आणि १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी पास केली. सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. अरुण जेटली यांनी २४ मे १९८२ रोजी संगीता जेटलीशी लग्न केले. त्यांना दोन मुले, मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली. अरुण जेटली यांचे २४ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी १२.०७ वाजता निधन झाले.

भारताची सोळावी लोकसभा[संपादन]

१६व्या लोकसभेच्या कारकिर्दीत (सन २०१४ ते २०१९ या काळात) अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

वकिली[संपादन]

जानेवारी १९९० मध्ये अरुण जेटली यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नेमले. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "About Me". Arun Jaitley (en-US मजकूर). 2019-08-01 रोजी पाहिले. 
  2. ^ "WHO IS ARUN JAITLEY". Business Standard India. 2019-08-01 रोजी पाहिले.