अमू दर्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Amu darya delta.jpg
अमू दर्याचे अंतराळातून घेतलेले प्रकाशचित्र, नोव्हेंबर इ.स. १९९४
उगम पामीर पठार
मुख अरल समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान
लांबी २,४०० किमी (१,५०० मैल)
उगम स्थान उंची ६,००० मी (२०,००० फूट)
सरासरी प्रवाह १,४०० घन मी/से (४९,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ५,३४,७३९
उपनद्या वख्श नदी, प्यांज नदी

अमू दर्या ही मध्य आशियातील सर्वात अधिक लांबीची नदी आहे. फारसी भाषेत 'दर्या' या शब्दाचा अर्थ समुद्र असा होतो. अमू नदीचा उगम 'आमुल' नावाच्या ठिकाणी होतो असे मानले जाते. हे ठिकाण सध्या तुर्कमेनाबात म्हणून ओळखले जाते. तेथे वख्श आणि प्यांज नद्यांच्या संगमातून अमू दर्याचा प्रवाह सुरू होतो.