अमजद खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमजद खान
जन्म १२ नोव्हेंबर १९४०
मुंबई, भारत
मृत्यू २७ जुलै १९९२
मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कारकीर्दीचा काळ १९७०-१९९०
भाषा उर्दू, हिंदी भाषा
प्रमुख चित्रपट शोले(१९७५), मुकद्दर का सिकंदर(१९७८)
अधिकृत संकेतस्थळ http://www.imdb.com/name/nm0451166/

अमजद खान (१२ नोव्हेंबर १९४० - जुलै २७, १९९२) एक भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक होते.सुमारे वीस वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी सुमारे १३० चित्रपटात काम केले. त्यांच्या १९७५ सालच्या शोले या चित्रपटातील गब्बरसिंग व मुकद्दर का सिकंदर (१९७८) या हिंदी चित्रपटातली खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.


अमजद खान यांचा जन्म प्रसिद्ध अभिनेता जयंतच्या पश्तून कुटुंबात पेशवरमध्ये झाला होता.

त्याला इम्तियाज खान आणि इनायत खान हे भाऊ आहेत. खान यांनी वांद्र्याच्या सेंट ॲन्ड्र्यू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.तसेच पुढचे शिक्षण त्यांनी आर डी नॅशनल कॉलेजमध्ये घेतले, जिथे ते बहुमताने निवडून आलेले विद्यार्थी गटाचे सरचिटणीस होते.