अब्दुल अहद रहबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. अब्दुल अहद रहबर हे एक हिंदुस्तानी कवी आहेत. ते मूळचे आजमगढ़ जिल्ह्याचे रहिवासी असून जौनपूरच्या अब्दुल अजीज अन्सारी डिग्री कॉलेजचे ते माजी प्राचार्य आहेत.

भागलपूरमध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यांनंतर डॉ. अब्दुल अहद रहबर यांनी आयुष्यभर हिन्दूमुस्लिम एकतेसाठी काम करण्याचे सुरू केले. त्यांनी स्वतःच्या नावाने मुस्लिम रहबर रामायण लिहिले आहे.

इस्लाम धर्मीय डॉ. रहबर यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. भारताला ते अध्यात्म योगाची आणि आयुर्वेदाची भूमी मानतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत भाषेला पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे भारतातील तरुण रामायणासारख्या ग्रंथाचे वाचन करू शकत नाहीत. रामायणाचे हिंदीत रूपांतर करण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे. त्यांच्या मते राम हा असा नायक आहे की जो मानवता, मूल्य, दया, करुणा आणि जगण्याचे धडे शिकवतो.

मूळ रामायणामध्ये सात कांडे आहेत. तर मुस्लिम रहबर रामायणात मर्यादा, गुरुकुल, स्वयंवर, नर-वानर विजय और उत्तम ही कांडे धरून एकूण नऊ कांडे आहेत. या रामायणात एक हजार सत्तर दोहे व तीन हजार चौपाया आहेत.