Jump to content

अबेय कुरूविला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अबेय कुरूविला किंवा आबे कुरुविला (८ ऑगस्ट १९६८) हा १९९० च्या दशकाच्या मध्यातला एक माजी भारतीय वेगवान गोलंदाज आहे, जो त्याच्या ६ फूट ५ इंच (१.९६ मीटर) उंची आणि चांगल्या आंगकाठीसाठी प्रसिद्ध आहे.

तो चेंबूर,या मुंबईच्या उपनगरात वाढला. २००० मध्ये त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कोचिंग घेणे सुरू केले. कुरुविला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कुरुविला हे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय वरिष्ठ निवड समितीचे सदस्य होते. तसेच ते पश्चिम विभागातील निवड समितीचे सदस्य होते. कुरुविलाच्या अचानक राजीनाम्याचे कारण ठरला तो बीसीसीआयचा नवीन नियम. या नियमानुसार, कोणताही निवडकर्ता ५ वर्षांपेक्षा जास्त काळ निवड समितीचा सदस्य राहू शकत नाही. आबे कुरुविला डिसेंबर २०२० मध्ये वरिष्ठ निवड समितीचे सदस्य झाले, पण त्यापूर्वी ते चार वर्षे कनिष्ठ निवड समितीचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना आपले पद सोडावे लागले होते. कुरुविला यांनी पायउतार झाल्यानंतर वरिष्ठ निवड समितीमध्ये ४ सदस्य उरले आहेत.

२ मार्च २०२२ ला अभय कुरुविला ला बीसीसीआयचे नवे सरव्यवस्थापक बनवण्यात आले आहे. बोर्डाचे माजी सरव्यवस्थापक धीरज मल्होत्रा ​​यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.


अबेय कुरूविला
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत ---
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी --- --- {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

ऑगस्ट ८, इ.स. २००६
दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)