अपर्णा अतुल घाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपर्णा अतुल घाटे (पूर्वाश्रमीच्या अपर्णा रमेश कुलकर्णी), या एक मराठी लेखिका आहेत. एम.ए. झाल्यावर त्यांना सन २०१३मध्ये विद्यावाचस्पतीची (पीएच्.डी.ची) पदवी मिळाली. त्यांच्या प्रबंधाचा विषय 'संत श्री देवनाथ महाराज : व्यक्ती वाङ्मय आणि कार्य' हा होता. .या विषयावरील पुस्तक आता उपलब्ध आहे. या पुस्तकास कोल्हापूर विद्यापीठाच्या संत गाडगे महाराज अध्यासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अपर्णा घाटे यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीची बरीच गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत. त्यांचे वास्तव्य पुणे येथे आहे.

अपर्णा घाटे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अनिवासी (कादंबरी)
  • अनुबंध (कादंबरी). याच नावाची अन्य पुस्तके :- कमल पाध्ये यांचे आत्मचरित्र, कृ.ब. निकुंब यांचा कवितासंग्रह, द.ता. भोसले याचे लोकसंस्कृती : बंध-अनुबंध हे पुस्तक, नंदकिशोर भोळे यांची कादंबरी, पराग घोंगे यांचा ललितलेख संग्रह, डाॅ. पी.जी. कुलकर्णी यांचा कथासंग्रह, प्रतिभा जगदाळे यांचा ललितलेख संग्रह, प्राचार्य डाॅ. म.सु. पगारे यांचे 'ग्रामीण - दलित साहित्याचा अनुबंध' हे पुस्तक, कार्डिफ येथे २०१२ साली झालेल्या युरोपीय मराठी साहित्य संमेलनाचा वृत्तान्त असणारे प्रकाशन, रवींद्र मालुसरे यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक, वर्षा रेगे यांची कादंबरी, डाॅ. विजया राजाध्यक्ष यांचा व्यक्तिचित्रण संग्रह, शांता शेळके यांचा कथासंग्रह, डाॅ. श्रीपाल सबनीस यांचे 'सेक्युलर वाङ्मयीन अनुबंध' नावाचे पुस्तक,श्रीराम पोफळी यांचा कवितासंग्रह, समीक्षा अरुणा सबाने यांची कादंबरी, सुधीर मोघे यांचे कलाविषयावरील पुस्तक, हेमलता पंडित यांचे धार्मिक रूढी, समारंभांबद्दलचे पुस्तक, वगैरे.
  • टुरिस्ट व्हिसा (कादंबरी)
  • सय (कवितासंग्रह)
  • संवेदना (कथासंग्रह)

अप्रकाशित साहित्य (मार्च २०१३)[संपादन]

  • ध्यास (तीन अंकी नाटक)
  • मी आहे (तीन अंकी नाटक)

पुरस्कार[संपादन]

  • अनुबंध या कादंबरीस केशर वाङ्मय पुरस्कार
  • जी.ए. कुलकर्णी कथा पुरस्कार
  • ’प्रौढ साक्षरता निरंतर’चा पुरस्कार
  • संत गाडगे महाराज अध्यासनाचा पुरस्कार
  • सय या कवितासंग्रहास औरंगाबादच्या जीवन विकास ग्रंथालयाचा काव्यकृती पुरस्कार
  • ’संवेदना’ कथासंग्रहास डॉ. मो.स. गोसावी साहित्य पुरस्कार.