Jump to content

अपघटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंद्रिय पदार्थावर वाढणारी बुरशी

अपघटक किंवा विघटक (इंग्लिश:Decomposer, उच्चार:डिकंपोजर) हे सूक्ष्मजीव आहेत जे मृत किंवा कुजणाऱ्या जैविक पदार्थांचे अपघटन किंवा विघटन करतात. ही क्रिया केवळ विशिष्ट वर्गातील जीवच करू शकतात जसे की काही कृमी, बुरशी आणि जीवाणू.[]

निसर्गचक्रात विघटन करणाऱ्या अपघटकाचे महत्त्व- विघटन करणारे जीव मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या मृतदेहांचे विघटन करण्यास मदत करतात आणि त्यामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे काम देखील होते. विघटन करणारे जीव मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत शरीरात असलेल्या विविध घटकांना पृथ्वीच्या पौष्टिक साठ्यात परत नेण्याचे काम करतात. अशा प्रकारे पोषक तत्वांच्या पुनर्प्राप्तीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि ही माती पुन्हा पुन्हा पिकांचे पोषण करत राहते. निसर्गातील क्लिष्ट घटकांचं विघटन करून जमिनीला पोषक द्रव्ये परत मिळवण्यास यांची मोठी मदत होते. 'Bacillus subtilis' आणि 'Pseudomonas fluorescens' ह्या दोन जातीचे जीवाणू तसेच 'Pleurotus Pulmonarius' आणि 'Aspergillus niger' ह्या दोन जातीच्या बुरशी हे अपघटकाचे उत्तम उदाहरण आहेत.

इतर शाकाहारी किंवा मांसाहारी प्राण्यांप्रमाणे, विघटन करणारे जीव हे हेटरोट्रॉफिक असतात, याचा अर्थ ते स्वतःची वाढ किंवा विकास करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातून ऊर्जा, कार्बन आणि पोषक घटक मिळवतात. अपघटक आणि सेंद्रिय पदार्थ खाणारे कृमीजंतु हे बऱ्याच वेळा एक समान समजले जातात. परंतु कृमी आणि जंतू हे कुजणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात आणि त्यातून त्यांच्यासाठी आवश्यक पोषक घटक द्रव्ये वापरून उर्वरित पदार्थ कुजणाऱ्या मल स्वरूपात बाहेर टाकतात. तर अपघटक हे कुजणाऱ्या पदार्थातून जैविक प्रक्रियेद्वारे पोषकद्रव्ये थेट शोषून घेतात. अशाप्रकारे, गांडुळे, वुडलिस आणि समुद्री काकडी सारख्या अपरिवर्तकीय प्राणी तांत्रिकदृष्ट्या थोडेसे हानिकारक असतात किंवा उत्तम विघटन करणारे नसतात, कारण त्यांना पोषक घटक घेणे आवश्यक असते.[] []

बुरशी

[संपादन]

पर्यावरणातील विविध कचऱ्याचे प्राथमिक विघटन करणारा मुख्य जीव बुरशी आहे.[][] कुजलेल्या प्राणिज किंवा वनस्पतिजन्य पदार्थावर निर्माण होणाऱ्या बुरशी शाखायुक्त तंतूचे जाळे विणतात. जिथे जीवाणू सेंद्रिय पदार्थाच्या उघड्या पृष्ठभागावर वाढतात, तिथे उलट बुरशी त्यांच्या शाखायुक्त तंतूच्या जाळ्याचा वापर पृष्ठभागाच्या खाली, सेंद्रिय पदार्थांच्या मोठ्या तुकड्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी करू शकते. याव्यतिरिक्त, केवळ कुजनारे लाकूड खाणाऱ्या बुरशीनी आपल्या आत लाकडातील रासायनिकदृष्ट्या जटिल पदार्थ लिग्नीन विघटित करण्यासाठी आवश्यक उत्प्रेरके (एंझाइम्स) विकसित केले आहेत.[] तंतूंचे जाळे आणि लिग्नीन विघटित उत्प्रेरके हे दोन घटक बुरशीला जंगलात प्राथमिक विघटन करणारे बनवतात. बुरशी सर्वप्रथम सडणारी सामग्री विघटित करण्यासाठी उत्प्रेरके (एंझाइम्स) सोडुन सेंद्रिय पदार्थांचे विघटन करते. त्यानंतर तंतुंच्या साह्याने सडलेल्या पदार्थातील पोषकद्रव्ये शोषून घेतात. पदार्थाचे विघटन करण्यासाठी आणि पोषकद्रव्ये शोषण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाखायुक्त तंतूंच्या जाळ्याचा पुनरुत्पादनात देखील वापर केला जातो. जेव्हा दोन सुसंगत बुरशीच्या तंतूंच्या जाळ्या एकमेकांच्या जवळ वाढतात, तेव्हा ते पुनरुत्पादनासाठी एकत्र संमिलित होतात आणि दुसरी बुरशी तयार करतात.[]

वेस्ट डिकंपोजर

[संपादन]

'सेंद्रिय शेतीचे राष्ट्रीय केंद्र' (नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग किंवा NCOF) ने कचरा विघटन करणारे जीवाणूंचे संघटन/विरजण विकसित केले आहे जे सेंद्रिय कचऱ्यापासून जलद कंपोस्टिंग, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि वनस्पती संरक्षण एजंट म्हणून वापरली जाते. हे देशी गायीच्या शेणापासून काढलेल्या 'तीन विशिष्ट जातीच्या' सूक्ष्म जीवाणूंचे संघटन किंवा विरजण आहे. याला वेस्ट डिकंपोजर असे नाव दिले आहे.[][]

वेस्ट डिकंपोजर ३० ग्रॅमच्या बाटलीत शेतकऱ्यांना माफक किमतीत घरपोच विकला जातो. हे संघटन/विरजण ICAR द्वारे प्रमाणित केलेले आहे. एका बाटलीतून १०,००० (दहा हजार) मेट्रिक टनांपेक्षा जास्त जैव-कचरा केवळ तीस दिवसांत विघटित होतो. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास बियांची उगवण क्षमता व वाढीचा वेग यात चांगला फरक पडतो. बुरशीजन्य जीवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोग नियंत्रणासाठी, उभ्या पिकावर फवारणी केली जाते.[][]

वेस्ट डिकंपोजर जमिनीत वापरल्याने सर्व प्रकारच्या मातीचे जैविक आणि भौतिक गुणधर्म (आम्लयुक्त आणि अल्कधर्मी) एकवीस दिवसांत बदलतात आणि केवळ सहा महिन्यांत एक एकर जमिनीत चार लाखांपर्यंत गांडुळांची संख्या निर्माण करण्यास मदत होते.[][]

गोकृपा अमृतम

[संपादन]

गुजरात राज्यातील अहमदाबाद स्थित 'बंसी गीर गोशाला' या संस्थेने गोकृपा अमृतम नावाचे एक जीवाणू संघटक विरजण निर्माण केले आहे. हे भारतात शेतकऱ्यांना सर्वत्र मोफत हस्तांतरित तथा वितरित केले जाते. याची निर्मिती गीर गायीचे पंचगव्य आणि काही आयुर्वेदिक औषधे यांच्या मिश्रणातून केलेली आहे. यात जवळपास 'साठ जातींचे उपयुक्त प्रोबायोटिक जीवाणू' आढळून येतात. गोकृपा अमृतम शेतात किंवा कंपोस्टिंग साठी वापरले असता त्यापासून अनेक लाभ होतात. यामुळे शेतातील जड सेंद्रिय पदार्थांचे वेगाने अपघटन होते. शेतातील शत्रू जीवाणू तथा बुरशींचा विनाश होतो. रासायनिक खते, अविघटीत क्षार तसेच लवकर न कुजणारे क्लिष्ट सेंद्रिय पदार्थ विघटित होऊन ते पिकांसाठी ग्रहण करण्यायोग्य स्वरूपात रूपांतरित होतात. इस २०१८ मधील एका सर्वेक्षणानुसार १३ पेक्षा अधिक राज्यातील ६०,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी याचा वापर केला होता. या विराजनाचा वापर जवळपास ४४ पेक्षा अधिक पिकांवर केल्याचे दिसून आले.[१०][११][१२]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "NOAA. ACE Basin National Estuarine Research Reserve: Decomposers". 2014-10-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-17 रोजी पाहिले.
  2. ^ Trophic level. Eds. M.McGinley & C.J.cleveland. Encyclopedia of Earth. National Council for Science and the Environment. Washington DC
  3. ^ "Decomposers". citadel.sjfc.edu. 2019-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-09 रोजी पाहिले.
  4. ^ Godbold, Douglas L.; Hoosbeek, Marcel R.; Lukac, Martin; Cotrufo, M. Francesca; Janssens, Ivan A.; Ceulemans, Reinhart; Polle, Andrea; Velthorst, Eef J.; Scarascia-Mugnozza, Giuseppe; De Angelis, Paolo; Miglietta, Franco (2006-03-01). "Mycorrhizal Hyphal Turnover as a Dominant Process for Carbon Input into Soil Organic Matter". Plant and Soil (इंग्रजी भाषेत). 281 (1): 15–24. doi:10.1007/s11104-005-3701-6. ISSN 1573-5036.
  5. ^ Talbot, J. M.; Allison, S. D.; Treseder, K. K. (2008). "Decomposers in disguise: mycorrhizal fungi as regulators of soil C dynamics in ecosystems under global change". Functional Ecology (इंग्रजी भाषेत). 22 (6): 955–963. doi:10.1111/j.1365-2435.2008.01402.x. ISSN 1365-2435. 2021-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-15 रोजी पाहिले.
  6. ^ Blanchette, Robert (September 1991). "Delignification by Wood-Decay Fungi". Annual Review of Phytopathology. 29: 281–403. doi:10.1146/annurev.py.29.090191.002121.
  7. ^ Waggoner, Ben; Speer, Brian. "Fungi: Life History and Ecology". Introduction to the Funge=24 January 2014.
  8. ^ a b c "NCOF waste decomposer" (इंग्रजी भाषेत). १५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  9. ^ a b c "वेस्ट डी कम्पोजर की 20 रुपए वाली शीशी से किसानों का कितना फायदा, पूरी जानकारी यहां पढ़िए" (इंग्रजी भाषेत). 2018-12-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  10. ^ "गौ कृपा अमृतम (बेक्टीरियल कल्चर)" (हिंदी भाषेत). 2021-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  11. ^ "Putting India First : India Positive Citizen Perspectives Vol I: Building a ... - Savitha Rao - Google Books" (इंग्रजी भाषेत). १५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  12. ^ "GoKrupa Amrutam - English | PDF | Bacteria | Agriculture - Scribd" (PDF). kvkkolhapur2.icar.gov.in. १५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.