अनोखी
प्रकार | खाजगी |
---|---|
उद्योग क्षेत्र | कापड, होम फर्निशिंग्ज, हातमागावरील कपडे, दागिने |
स्थापना | १९७० |
संस्थापक | जॉन आणि फेथ सिंह |
मुख्यालय | जयपुर, भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती |
प्रीतम सिंग (एम डी) रेचल ब्रॅकन सिंग(डिजाईन डायरेक्टर) |
संकेतस्थळ |
anokhiusa |
अनोखी (अर्थ "उल्लेखनीय" किंवा "अद्वितीय") हा एक भारतीय किरकोळ विक्रेता आहे जो राजस्थानच्या जयपूर येथे स्थित आहे. हे पारंपारिक भारतीय रचना आणि तंत्रांनी बनविलेले कपडे, फर्निचर आणि इतर वस्तू विकतात. [१] हे पारंपरिक राजस्थानी हँड ब्लॉक किंवा वुडकट प्रिंटिंग तंत्र पुनर्जीवित करण्यावर आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करतात. स.न. १९७० मध्ये पती-पत्नी असलेले, जॉन आणि फेथ सिंग यांनी ही कंपनी स्थापित केली होती. [२] अनोखी कंपनी राजस्थानी कलाकारांबरोबर थेट काम करते आणि भारतातल्या २५ स्टोअरमध्ये आणि युरोप व अमेरिकेतील काही स्टोअरमध्ये विकते.
इतिहास
[संपादन]पारंपारिक भारतीय तंत्राचा वापर करून समकालीन उत्पादने तयार करण्याच्या उद्देशाने जॉन आणि फेथ सिंग यांनी १९७० मध्ये अनोखीची सुरुवात केली होती. [३] अनोखीचे खर लक्ष कपड्यांच्या अधुनिक युगात राजस्थानी हस्तकलेच्या हँड-ब्लॉक मुद्रण तंत्राचे पुनरुज्जीवन करण्यावर होते. [४][५][६][७]
संदर्भ
[संपादन]- ^ Shivani Vora (2019-04-05). "Five Places to Shop Around Mumbai". न्यू यॉर्क टाइम्स. 2020-05-26 रोजी पाहिले.
- ^ "The Skill Set". The New York Times. 2009-05-17. 2020-05-26 रोजी पाहिले.
- ^ "Conservationist John Singh dies of heart attack". द टाइम्स ऑफ इंडिया. 2016-04-15. 2020-05-27 रोजी पाहिले.
- ^ Srinivasan, Pankaja (May 28, 2016). "Prints off the old block". द हिंदू.
- ^ "Hand block printing in India - Colours of the rainbow | Prospero". The Economist. 2012-11-08. 2020-05-27 रोजी पाहिले.
- ^ Amy Yee (2011-05-27). "Indian Print Artisans at Work". The New York Times. 2020-05-26 रोजी पाहिले.
- ^ Hanya Yanagihara (2016-10-27). "When in India, Make Your Own Block-Printed Fabrics". The New York Times. 2020-05-26 रोजी पाहिले.