Jump to content

अनुरूपा देबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनुरूपादेवी या पानावरून पुनर्निर्देशित)

अनुरूपादेवी ह्या एक बंगाली कादंबरीकर्त्या होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव राय मुकुंददेव मुखोपाध्याय होते. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व लेखक भुदेव मुखोपाध्याय हे त्यांचो आजोबा होते. पतीचे नाव शेखरनाथ बंदोपाध्याय होते.

घरातील अनुकूल वातावरणामुळे प्रथमपासून त्यांना साहित्याची आवड होती. शरच्चंद्र चतर्जी यांच्या काळी लेखक-लेखिकांची जी एक प्रभावळ निर्माण झाली, तीत अनुरूपादेवींचे स्थान बरेच वरचे होते. त्यांनी कथा व कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी मुख्यत्वेकरून कादंबरीकर्त्या म्हणूनच त्या प्रसिद्ध आहेत.

पोष्यपुत्र, मंत्रशक्ति, मा, महानिशा इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या आणि त्यांना ‘उपन्यास सम्राज्ञी’ म्हणूनच वाचक ओळखू लागले.