अनुपमा होस्केरे
अनुपमा होस्केरे (डिसेंबर २०, इ.स. १९६४:कर्नाटक, भारत ) ह्या मास्टर कठपुतळी कलाकार आणि कठपुतळीच्या पारंपारिक कलाप्रकाराला पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करणाऱ्या धातू पपेट थिएटर, बंगळूर च्या संस्थापक-संचालक आहेत. [१]आणि त्या प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्काराच्या २०१८ साल मधील प्राप्तकर्त्या आहेत.[२][३]
अनुपमा होस्केरे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | २०डिसेंबर १९६४ |
जन्म स्थान | बंगळूर , कर्नाटक, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
गौरव | |
पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
ओळख आणि कारकीर्द
[संपादन]श्रीमती अनुपमा होस्केरे यांचा जन्म २० डिसेंबर १९६४ रोजी बंगळूर येथे झाला. श्रीमती अनुपमा या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बंगळूरमधून अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, लॉंग बीच येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. [४] या संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त श्री एम.आर. रंगनाथ राव यांच्याकडून कर्नाटकातील पारंपरिक स्ट्रिंग कठपुतळीची कला शिकली आहे.[५] कठपुतळी बनवणे, पपेट थिएटर प्रोसेनियम डिझाइन, कठपुतळी नाटकांसाठी स्क्रिप्ट लेखन आणि कठपुतळी थिएटरमध्ये प्रकाश आणि ध्वनी प्रभाव यासह कठपुतळीच्या संमिश्र कला प्रकारातील प्रत्येक पैलूंचा तिला विस्तृत अनुभव आहे.[६] कठपुतळी कलेकडे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने तिने कठपुतळी महोत्सव आयोजित करणे आणि भारतभरातील कलाकारांना आमंत्रित करणे सुरू केले. सात वर्षांपूर्वी २०१५ मध्ये हा महोत्सव आंतरराष्ट्रीय बनला आणि धातू आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाऊ लागला.[७]
पुरस्कार
[संपादन]आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनने कठपुतळीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला विशालाक्षी पुरस्कारासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत[८]; आणि असोसिएशन ऑफ कन्नड कूटस ऑफ अमेरिका (एकेकेए), सॅन फ्रान्सिस्को, यू.एस.ए. कडून कठपुतळी क्षेत्रातील उत्कृष्ट महिला पुरस्कार. कर्नाटकातील कठपुतळीतील योगदानाबद्दल श्रीमती अनुपमा होस्केरे यांना २०१८ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[९]
संदर्भ
[संपादन]- ^ "Puppets have no ego: Anupama Hoskere". thehindu.com (English भाषेत). 5 September 2019. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "The General Council of the Sangeet Natak Akademi Announces Sangeet Natak Akademi Fellowships (Akademi Ratna) and Sangeet Natak Akademi Awards (Akademi Puraskar) for the Year 2018". pib.gov.in (English भाषेत). 16 July 2019. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Puppetry is serious business: Anupama Hoskere, an engineer, breathes life into this traditional art form". economictimes.com (English भाषेत). 25 June 2019. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Toy story with a twist". Deccanherald.com (English भाषेत). 22 October 2010. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Reviving the strings of yore". bangloremirror.com (English भाषेत). 1 September 2013. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Now, puppets with a robotic touch". Indianexpress.com (English भाषेत). 17 May 2010. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "First international puppet festival from January 1". thehindu.com (English भाषेत). 27 December 2014. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Awards 2018". artofliving.org (English भाषेत). 18 February 2023. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "अनुपमा होस्केरे" (PDF). sangeetnatak.gov.in (English भाषेत). 18 February 2023. 18 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)