अनारकली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्दुर रहमान चुगताई यांनी चितारलेले अनारकलीचे काल्पनिक चित्र

अनारकली (शाहमुखी पंजाबी लिपी: انارکلی गुरुमुखी लिपी: ਅਨਾਰਕਲੀ; अर्थ: डाळिंबाची कळी;) ही इ.स.च्या १७ व्या शतकातील लाहोर, पंजाब येथील एक गुलाम स्त्री होती. आख्यायिकांनुसार मोगल सम्राट अकबर याचा मुलगा सलीम (उत्तरकाळात जहांगीर म्हणून परिचित) याचे तिच्याशी प्रेमसंबंध होते; मात्र अकबरास त्यांचे संबंध अमान्य असल्याने त्याने अनारकलीला भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा फर्मावली. प्रत्यक्षात या कथाप्रसंगांबद्दल आजवर विश्वासार्ह पुरावा सापडला नसल्याने, अनारकलीची ही कथा पूर्णतः काल्पनिक किंवा किमानपक्षी फुगवून सांगितली असावी. मात्र साहित्यातून, लोककला, कला, चित्रपटादी माध्यमांतून ही आख्यायिका उत्कटपणे वारंवार मांडण्यात आली आहे. अनारकली आणि मु्गले आझम अशा किमान दोन हिंदी चित्रपटांत ही कथा आली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]