अनरसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अनारसा

अनरसा हा खाद्यपदार्थ तांदूळ गूळ वापरून तयार केला जातो.[१] हा विशेषतः दिवाळीत आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी बनवतात. हा पदार्थ महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही लोकप्रिय आहे. अनरसा हा अतिशय प्राचीन पदार्थ आहे. संस्कृतमध्ये अनरशाला अपूप म्हणतात. अनारसे हा एक भारत देशातील खाद्य पदार्थ आहे.[२] सामान्यपणे हिंदूच्या दीपावलीच्या सनात महाराष्ट्र आणि बिहार मध्ये बनविल्या जाणार्‍या विविध उपअहारातील हा एक पदार्थ आहे.[३] हा पदार्थ बनविण्यासाठी गूळ, तांदूळ, साजूक तूप, वेलची, खसखस, यांचा वापर करतात.

अनारसे बनविण्याची पद्दत[संपादन]

अनरशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मग वाळवतात. त्यादरम्यान तांदूळत सौम्यता येण्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी त्यातील पाणी बदलतात. त्यानंतर तो तांदूळ सुकवितात आणि त्याचे मिक्सरवर बारीक पीठ करून घेतात. त्याला पिठी म्हणतात. त्यात त्याच प्रमाणात गूळ किंवा साखर मिसळतात आणि सुगंधासाठी वेलची व न कळत मीठ घालतात.[४] वाळलेले तांदूळ किंचित ओलसर असताना कुटतात, पुन्हा वाळवतात, चाळतात आणि गूळ मिसळून त्याचे मोठमोठे गोळे करून ठेवतात. पुढे वर्षभरात जेव्हा अनरसे बनवायचे असतील तेव्हा यांततला एक गोळा घेऊन त्यात कुस्करलेले केळे मिसळतात. त्यात केळाचा कुस्करा मिक्स करावयाचा. केळं मिक्स करताना गूळ पिठात चांगला मिक्स झाला आहे का याची खात्री करवयाची. गूळ मिक्स झाला नसेल तर त्यात केळी घालावायची नाहीत. मोठ्या गोळ्यातून एखादा अतिशय छोटा गोळा घेऊन तो खसखस लावून थापतात. ही थापटपुरी तुपात तळली की अनरसा तयार होतो. बनवलेला अनरसा सामान्य तापमानाला अनेक दिवस खाण्यायोग्य राहतो. त्या चकत्या खसखस लावलेली बाजू वर ठेऊन अगदी ब्राऊन होईपर्यंत तुपात तळावयाच्या आणि त्यानंतर पसरट अशा कोरड्या भांड्यात त्याच पददतीने ठेवावयाच्या आणि खाण्यासाठी सर्व्ह करावयाच्या.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अनरसा". ट्विस्टऑफ़फ़ूड.कॉम. १० सेप्टेंबर २०१४. 
  2. ^ "दीवाली पर बनती है ये स्पेशल मिठाई". अमरउजाला.कॉम. २२ ऑक्टोबर २०१४. 
  3. ^ "चेंजिंग डाइटरी पैटर्न्स एंड हैबिट्स : अ सोसिओ-कल्चरल स्टडी ऑफ़ बिहार". बुक्स.गूगल.को.इन. १९ मे २०१६. 
  4. ^ "गुड फ़ूड सीक्रेट्स: अनरसा". डाइसदस्पाइस.ब्लागस्पाट.इन. १६ जून २०१२. 
  5. ^ "अनरसा इन इंडिया". इंडिया९.कॉम. २६ ऑक्टोबर २०१५.