अनंतपूर शहर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंतपूर शहर विधानसभा मतदारसंघ - १५३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. अनंतपूर शहर हा विधानसभा मतदारसंघ अनंतपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.