Jump to content

अध्यापनाची भाषिक उद्दिष्ट्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणूस आपले जीवन जगत असताना कोणती ना कोणती तरी गोष्ट साध्य करीत असतो, तेव्हा तो अमूक एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच त्या दिशेने कार्य करीत असतो. त्याला प्रवासाला जायचे असेल तर गाव, तारीख, वेळ हे निश्चित केल्यावरच हव्या त्या त्या गावाला जाता येते. त्याठिकाणी जायचे स्थळ आणि तिथे गेल्यावर करावयाचे काम ह्या दोहोंचा तपशील माणसाजवळ असणे आवश्यक आहे. ज्यामुळेत कोणतेही कार्य पूर्णत्वास जाते. म्हणून दूर अंतरावर असणाऱ्या लक्ष्याला उद्दिष्ट म्हणतात. भाषिक उद्दिष्ये ही सर्वसामान्यपणे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चित केली जातात. त्यात विद्यार्थ्यांचे वय, आकलनक्षमता, निरीक्षणक्षमता, लेखनक्षमता, वाढ आणि विकास यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. ही त्या त्या भाषेचे सामान्य भाशिक उद्दिष्ट असतात. भाषेची दोन कार्ये असतात.संबंधित भाषा पूर्णपणे आकलन करून घेऊन त्यातील सर्व बारकावे समजून घ्यावे लागतात. भाषा समजल्यानंतर तिचा दैनंदिन जीवनात वापर करणे गरजेचे असते. आपल्या मनातील विचार भावना, कल्पना किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी समजलेल्या भाषेचा वापर करता येतो. त्यासाठी भाषेच्या क्षमतेचा/उद्दिष्टांचा विकास होणे आवश्यक आहे.

ग्रहणात्मक भाषिक उद्दिष्ट्ये

[संपादन]

श्रवण

[संपादन]

कोणताही ध्वनी कानावर पडताच कर्णेंद्रियावर त्याचा आघात होत असतो. तेथून मेंदूकडे जाऊन त्यासा परस्पर संबंध लावला जातो. श्रवणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानांग, भावांग विकसित करता येते. त्यासाठी कानाला ऐकण्याची सवय लावणे गरजेचे असते. शब्दाचे परस्पर संबंध लक्षात घेऊन स्थल, काल व हेतू यांची जाणीव ठेवून ऐकणे व त्याला योग्य प्रतिसाद देणे, बोलण्यातील नेमकेपणा जाणून घेऊन योग्य-अयोग्य, पसंती-नापसंती, होकार-नकार असा प्रतिसाद देणारा शब्द किंवा भाव व्यक्त व्हायला हवा. श्रवणक्षमता विकसित करण्यासाठी प्रकटवाचन, निमंत्रितांची व्याख्याने, शुद्ध स्वर व अचूक उच्चारणपूर्ण वर्गाध्यापन इत्यादी करणे गरजेचे असते. वाद-विवाद स्पर्धा, गीत गायन, अशांतून विद्यार्थ्यांच्या श्रवणभमतेचा विकास साधता येतो.

वाचन

[संपादन]

वाच्य् या संस्कृत धातूपासून वाचन हा शब्द आला आहे. ध्वनीच्या अर्थपूर्ण उच्चारणास वाचन असे म्हणतात. व्यक्तीच्या मनात ध्वनी व अक्षर यांच्या एकत्रित येण्यापासून एक अर्थपूर्ण रचना तयार होते. या अर्थाचे ध्वनीउच्चारण म्हणजेच वाचन होय. शब्दा-शब्दामधील भेद ओळखून वाचणे, संथ व समजून वाचणे, मोठ्याने, स्पष्टपणे व न अडखळता वाचणे, आशयानुसार चढ-उतार, हेल, सुरावली, बालाघात, अल्पविश्रांती, पूर्णविश्रांती घेण्याची स्थळे लक्षात घेऊन वाचन केल्याने वाचनक्षमता विकसित होते. विद्यार्थ्यांची वाचनक्षमता विकसित करण्यासाठी त्यांना प्रकटवाचन स्पष्टपणे व मोठ्याने करावयास लावले पाहिजे. विविध मनोरंजनपर गोष्टींची पुस्तके , वर्तमानपत्रे, मासिके, उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांची वाचनक्षमता विकसित होण्यास मदत होते.

प्रकटीकरणात्मक भाषिक उद्दिष्ट्ये

[संपादन]

भाषण

[संपादन]

भाषा ग्रहणाबरोबरच भाषा प्रकटीकरणही महत्त्वाचे आहे. त्यासाठी भाषण आणि लेखन ह्या दोन्ही क्षमता प्रभावी असाव्या लागतात.

लेखन

[संपादन]

लेखनाचे उदिष्टे:- आपले विचार,भावना अनुभव,कलप्ना इत्यादी. परिणामकारकतेने व्यक्त करण्यासाठी आवश्यक ते लेखन कौष्यल्य प्राप्त करने. सुवाच्च वळणदार स्पष्ट अक्षरात लेखन करणे. विरामचिन्हे यांचा योग्य रीतीने वापर करून लेखनाच्या नियमानुसार नीटनेटके लेखन करता येणे.