Jump to content

अतुल गावंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतुल गावंडे (५ नोव्हेंबर, १९६५:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हे अमेरिकेतील एक मराठी डॉक्टर आहेत. ते बॉस्टनच्या ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तसेच द डेना फार्बर कॅन्सर इन्स्टिस्ट्यूट येथे शल्यविशारद, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक व न्यू यॉर्कर या नियतकालिकात विज्ञानविषयक स्तंभ लिहिणारे लेखक आहेत. ते संशोधन व स्तंभ लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या मॅकऑर्थर पारितोषिकाचे विजेते आहेत.[] लोकहिताचे लेखन केल्याबद्दल २०१०चा नॅशनल मॅगेझिन पुरस्कार गावंडे यांना मिळाला आहे.

फॉरेन पॉलिसी या अमेरिकन नियतकालिकाने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीतील ८ भारतीयांमध्ये गावंडे हे एक होते. अमेरिकन आरोग्यसेवेत बदल घडविणारा गावंडे यांचा ग्लोबल पेशंट सेफ्टी चॅलेंज नावाचा कृतिआराखडा आज जगभरातील ३ हजारांहून अधिक हॉस्पिटलांमध्ये राबविला जात आहे.

शिक्षण

[संपादन]

गावंडे यांचे शालेय शिक्षण ग्रीसमध्ये आणि पुढील वैद्यकीय शिक्षण स्टॅनफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठांतून झाले. शिवाय त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन अाॅक्सफर्ड विद्यापीठातून एम.ए. केले आहे.

पुस्तके

[संपादन]
  • कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स (या पुस्तकाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.)
  • Better : A Surgeon's Notes on Performance
  • The Checklist Manifesto : How to Get Things Right
  • Being Mortal : Medicine and What Matters in the End

सन्मान

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

२००९ साली न्यूयाॅर्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या गावंडे यांच्या दोन विशिष्ट शहरांतील आरोग्यसेवांची तुलना करणाऱ्या एका लेखामुळे अमेरिकत एकच खळबळ उडाली. त्या लेखाला एका अमेरिकन उद्योगपतीने २०,००० डाॅलर्सचा पुरस्कार दिला. गावंडे यांनी तत्काळ ती रक्कमब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलला देणगीदाखल दिली. अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन आरोग्यविषयक विधेयक पारीत करताना त्या लेखाचा उपयोग झाल्याचे आवर्जून सांगितले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "डॉ अतुल गावंडे यांचे चेकलिस्ट मॅनिफेस्टो या नावाचे एक पुस्तक". 2017-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-16 रोजी पाहिले.