अजित दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रा. अजित दळवी हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून एक मराठी नाटककार व पटकथालेखक आहेत. मीराबाई, काय द्याचं बोला, ’तुकाराम’, ’आजचा दिवस माझा’ आणि ’दुसरी गोष्ट’ या चित्रपटांची कथा त्यांची आहे. ’दुसरी गोष्ट’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

त्यांनी गांधी विरुद्ध गांधी, शतखंड, डॉक्टर तुम्हीसुद्धा ही नाटके लिहिली आहेत.

नाटके[संपादन]

  • गांधी विरुद्ध गांधी
  • डॉक्टर तुम्हीसुद्धा
  • शतखंड
  • समाजस्वास्थ्य (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला आहे.)

पुरस्कार[संपादन]

  • ‘समाजस्वास्थ्य’ नाटकासाठी अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा २५ हजार रुपयांचा रा.शं. दातार नाट्यपुरस्कार. (१३-१-२०१८)
  • ’दुसरी गोष्ट’ या चित्रपटाच्या पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार