अखिल शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


प्रा. अखिल शर्मा (जन्म : दिल्ली, २२ जुलै, १९७१) हे नेवार्कमधील रुटजर्स विद्यापीठात सर्जनशील लेखन या विषयाचे अध्यापक असून इंग्रजी भाषेत लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत.

अखिल शर्मा हे वयाच्या आठव्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाले. तेथे व्रुडो विल्सन शाळेत असताना त्यांनी जॉइस कॅरोल ओट्स, पॉल ऑस्टर, जॉन मॅक्फी, टोनी कुशनर, टोनी मॉरिसन यांच्या साहित्याचा अभ्यास केला होता. प्रिन्सटन विद्यापीठातून त्यांनी बी.ए. केले. अखिल शर्मा यांनी बॅंकेत नोकरी केली., चित्रपट कथालेखक म्हणून काम केले, पण त्यात ते रमले नाहीत. पुढे न्यूयॉर्कर, अ‍ॅटलांटिक अशा नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले. सन २००० मध्ये लिहिलेली 'ॲन ओबिडियन्ट फादर' ही त्यांची पहिली कादंबरी.

अखिल शर्मा यांच्या 'फॅमिली लाइफ' या कादंबरीला ब्रिटनमध्ये नुकताच चाळीस हजार पौंडांचा फोलिओ पुरस्कार मिळाला आहे.

'फॅमिली लाइफ'ची हकीकत[संपादन]

'फॅमिली लाइफ' या कादंबरीत दिल्ली ते न्यूयॉर्कमधील क्वीन्सपर्यंतचा प्रवास उलगडत गेला आहे. अखिल शर्मा, आई-वडील व भावासमवेत तेथे गेले व नंतर त्यांच्या भावाला पोहताना डोक्याला जबर जखम झाली. त्या तीन मिनिटांत शर्मांचे सगळे जगच बदलून गेले. कर्तव्य आणि अस्तित्वाचा लढा यात दुभंगलेल्या तरुणाची गोष्ट त्यातून साकारत गेली. दुर्दैवी घटना कुणाच्याही आयुष्यात घडू शकते तशी त्यांच्या भावाच्या आयुष्यात घडली, पण त्याचा परिणाम म्हणून तो शेवटची तीस वर्षे अंथरुणाला खिळून होता. ही कादंबरी म्हणजे अखिल शर्मांचे त्यांचा भाऊ आणि आई-वडील यांच्यावरचे अजरामर प्रेमगीत आहे, असे म्हटले जाते.

अखिल शर्मा यांनी लिहिलेल्या इंग्रजी कादंबर्‍या[संपादन]

  • ॲन ओबिडियन्ट फादर (२०००)
  • फॅमिली लाइफ (२०१४)

अखिल शर्मा यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • ’ॲन ओबिडियन्ट फादर’साठी पेन/हेमिंग्वे पुरस्कार (२००१)
  • ’ॲन ओबिडियन्ट फादर’साठी व्हाइटिंग रायटर्स पुरस्कार
  • ’फॅमिली लाइफ’साठी फोलिओ पारितोषिक (२०१५)
  • न्यूयॉर्क टाइम्सनेव व न्यूयोर्क मॅगेझिनने ’फॅमिली लाइफ’ या पुस्तकाची ’वर्षातल्या १० उत्कृष्ट पुस्तका’मध्ये निवड केली. (२०१४)


इ.स. १९७१ मधील जन्म