अकॉर्ड मेट्रोपॉलिटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एक्कोर्ड मेट्रोपॉलिटन हे पंचतारांकित (5-स्टार) हॉटेल आहे.[१] हे भारत देशाचे तामिळनाडू राज्याचे चेन्नई राजधानीत टी. नगर, जी.एन शेट्टी मार्ग, येथे आहे. हे हॉटेल पूर्वी ट्रडेर्स हॉटेल म्हणून ओळखले जात असे.[२] या हॉटेलच्या बांधकामाचा खर्च १००० मिल्यन होता.

हे हॉटेल १३ मजल्याचे आहे आणि त्यात १६२ खोल्या आहेत. त्यात प्रेसीडेंशियल सुट्स, थ्री स्टुडिओ अपार्टमेंट्स, सिक्स ऐष आरामदाई (Deluxe) सुट्स आणि 9 एक्कोर्ड क्लब रूम्स आहेत.[३] या हॉटेलचा खोल्यांचा आकार ३० चौ.मीटर आहे. या हॉटेल मध्ये ४ खानपान आणि मनोरंजनाच्या सुविधा आहेत. त्यामध्ये सोराजिमा(जॅपनीज रेस्टोरंट) रोयल इंडियाना, समकालीन इंडियन रेस्टोरंट(नोवेंबर २०११ मध्ये स्थपित), झोडियाक, बार हॉटेल, आणि पेर्गोला, रूफ्तोप रेस्टोरंट आहेत.[४] ३ मेजवानी हॉल या हॉटेलमध्ये आहेत. क्रिस्टल, एमीराल्ड आणि सफायर हे त्यांचे नाव आहेत. १००० अतिथी पर्यंत सामावून घ्याची क्षमता या हॉलची आहे. एक्कोर्ड मेट्रोपॉलिटन हॉटेलमध्ये ५१६ चौ.मीटर भव्य गोलाकार खोलीचा (ग्रँड बॉल रुम) समावेश आहे.[५] या खोलीची विभागणी 2 रूम्स मध्ये केली जाऊ शकते. त्या व्यतिरिक्त या हॉटेल मध्ये ४५० चौ.मीटर आकाराचा मेजवानी हॉल आहे.

इतर सुविधा[संपादन]

दुरध्वनी, २४ तास सुरक्षा व्यवस्था, पाळणा घर, मुलांचा पोहण्याचा तलाव, ब्वुटी सलून, स्वास्थ्य केंद्र, मसाज केंद्र, प्रवासी मार्गदर्शक, वेड्डिंग सर्विसेस, शॉपिंग, बॉडी ट्रीटमेंट्स, वाहतूक सुविधा, स्टीम बाथ, वलेट पार्किंग, पार्किंग, केटरींग सर्विस, जकूज्जी व इ. सुविधा आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "एक्कोर्ड मेट्रोपॉलिटन पंचतारांकित हॉटेल". एम्पोरिस.कॉम. २० जुलै २०१२. 
  2. ^ "ट्रडेर्स हॉटेलच नाव बदलण्यात आले". दहिंदूबिझिनेसलाईन.कॉम. १ नोवेम्बर २००५. 
  3. ^ "एक्कोर्ड मेट्रोपॉलिटन हॉटेलच्या सुख-सुविधा बद्दल". क्लियरट्रिप.कॉम. ७ सेप्टेंबर २०१६. 
  4. ^ "रोयल इंडियाना रेस्टोरंट, हॉटेल एक्कोर्ड मेट्रोपॉलिटन मध्ये उघडण्यात आले". इंडियापीआरवायर.कॉम. २२ नोव्हेंबर २०११. 
  5. ^ "शांग्री-ला रेस्टोरंट, ट्रडेर्स हॉटेल मध्ये उघडण्यात आले". आशियाट्रॅव्हलटिप्स.कॉम. २८ एप्रिल २००५.