एकॉर्ड मेट्रोपॉलिटन हॉटेल (चेन्नई)
एक्कोर्ड मेट्रोपॉलिटन हे पंचतारांकित (5-स्टार) हॉटेल आहे.[१] हे भारत देशाचे तामिळनाडू राज्याचे चेन्नई राजधानीत टी. नगर, जी.एन शेट्टी मार्ग, येथे आहे. हे हॉटेल पूर्वी ट्रडेर्स हॉटेल म्हणून ओळखले जात असे.[२] या हॉटेलच्या बांधकामाचा खर्च १००० मिल्यन होता.
हे हॉटेल १३ मजल्याचे आहे आणि त्यात १६२ खोल्या आहेत. त्यात प्रेसीडेंशियल सुट्स, थ्री स्टुडिओ अपार्टमेंट्स, सिक्स ऐष आरामदाई (Deluxe) सुट्स आणि 9 एक्कोर्ड क्लब रूम्स आहेत.[३] या हॉटेलचा खोल्यांचा आकार ३० चौ.मीटर आहे. या हॉटेल मध्ये ४ खानपान आणि मनोरंजनाच्या सुविधा आहेत. त्यामध्ये सोराजिमा(जॅपनीज रेस्टोरंट) रोयल इंडियाना, समकालीन इंडियन रेस्टोरंट(नोवेंबर २०११ मध्ये स्थपित), झोडियाक, बार हॉटेल, आणि पेर्गोला, रूफ्तोप रेस्टोरंट आहेत.[४] ३ मेजवानी हॉल या हॉटेलमध्ये आहेत. क्रिस्टल, एमीराल्ड आणि सफायर हे त्यांचे नाव आहेत. १००० अतिथी पर्यंत सामावून घ्याची क्षमता या हॉलची आहे. एक्कोर्ड मेट्रोपॉलिटन हॉटेलमध्ये ५१६ चौ.मीटर भव्य गोलाकार खोलीचा (ग्रँड बॉल रुम) समावेश आहे.[५] या खोलीची विभागणी 2 रूम्स मध्ये केली जाऊ शकते. त्या व्यतिरिक्त या हॉटेल मध्ये ४५० चौ.मीटर आकाराचा मेजवानी हॉल आहे.
इतर सुविधा
[संपादन]दुरध्वनी, २४ तास सुरक्षा व्यवस्था, पाळणा घर, मुलांचा पोहण्याचा तलाव, ब्वुटी सलून, स्वास्थ्य केंद्र, मसाज केंद्र, प्रवासी मार्गदर्शक, वेड्डिंग सर्विसेस, शॉपिंग, बॉडी ट्रीटमेंट्स, वाहतूक सुविधा, स्टीम बाथ, वलेट पार्किंग, पार्किंग, केटरींग सर्विस, जकूज्जी व इ. सुविधा आहेत.