अंतरिम अर्थसंकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

हंगामी अर्थसंकल्पलेखानुदान हे सर्व शब्द एकमेकांची भावंडे असून या सर्व शब्दांचा अर्थ अंतरिम अर्थसंकल्प असाच आहे. अंतरिम अर्थसंकल्प संसदेला केव्हा सादर होतो हे प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. सत्तेवर असलेल्या सरकारची मुदत संपूर्ण आर्थिक वर्षांकरिता असेल तर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो; परंतु आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर थोडयाच दिवसांत/ महिन्यांत सरकारची मुदत संपत असेल व त्यानंतर निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन होणार असेल तर अस्तित्वात असलेल्या सरकारला पुढील पूर्ण वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार नाही.

समजा, आर्थिक वर्ष संपता संपता म्हणजेच मार्चमध्ये जर नवीन सरकार सत्तेवर आले तर अशा वेळी अंतरिम अर्थसंकल्प तयार करतात. आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प मंजूर झालेला असल्यामुळे संपणाऱ्या वर्षांतील काही दिवसांचा खर्च करणे सरकारला अडचणीचे नसते; परंतु नवीन वर्षांपासून म्हणजेच १ एप्रिलपासून सरकार संसदेच्या परवानगीशिवाय खर्च करू शकत नाही. मग खर्चाचा देशाचा गाडा कसा चालणार? अर्थसंकल्प सादर करणे, त्यावर संसदेत चर्चा होणे व तो मंजूर होणे यास अवधी लागतो. तेवढा अवधी सत्तेवर आलेल्या सरकारकडे नसतो. मग परवानगी घेण्याचा एकच मार्ग व तो म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.