Jump to content

अंगणवाडी दत्तक धोरण (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शासनाची एकात्मिक बाल विकास सेवा योजना विविध शासकीय विभाग व सामाजिक संस्था यांच्या अभिसरणाद्वारे राबविणे हे योजनेच्या उद्दिष्टातच आहे. या योजनेचे उद्दिष्ट लोकसहभागाद्वारे योजनेचे बळकटीकरण करून साध्य करता येईल. या योजनेच्या सफलतेसाठी अंगणवाडी केंद्र सक्षम होणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेऊन अंगणवाडी दत्तक धोरण (Adoption of Anganwadi)[] शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ४ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या परिपत्रकाद्वारे केली.

केंद्र शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांच्या सुधारणेसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी व सुविधांच्या व्यतिरीक्त लोकसहभाग देखील अत्यंत महत्वाचा आहे, केंद्र शासनाने सांगितले होते.

सहभागी घटक

[संपादन]
  • कॉर्पोरेट कंपनी व त्यांचे मार्फत राबविण्यात येणारा व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) कार्यक्रम
  • अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था (एनजीओ)
  • विविध ट्रस्ट
  • संघटना
  • रोटरी क्लब (Rotary Club)
  • लायन्स क्लब (Lions Club) इ.
  • व्यक्ती/कुटुंब/समूह

सुविधा[]

[संपादन]

अ) भौतिक सुविधा

  • अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम (शासनाच्या मंजूर टाईप प्लॅन नुसार)/स्वमालकीच्या इमारत दुरुस्ती/रंगरंगोटी/अंगणवाडी केंद्राभोवती कुंपण बांधणे.
  • शौचालय बांधकाम व दुरुस्ती, पाणी वापरासाठी टाकी इ.
  • पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी
  • शुद्धीकरणासाठी प्युरिफायर बसविणे, पाणी साठवण व्यवस्था
  • अंगणवाडी केंद्रात अन्न शिजविण्यासाठी तसेच आहार देण्यासाठी आवश्यक ते साहित्य
  • विद्युत पंखा, सेफ्टी कुलर इ.
  • सौर उर्जा संच
  • परसबाग (पोषण वाटिका) तयार करून देणे.

ब) शैक्षणिक सुविधा

  • पूर्व शालेय शिक्षणाशी संबंधित भारतीय बनावटीचे खेळ साहित्य संच पुरविणे.
  • बैठक व्यवस्थेकरिता खुर्ची, बेंच, बस्कर पट्ट्या, सतरंजी इ.
  • रंगीत टी व्ही, शैक्षणिक कार्यक्रम लोडेड पेन ड्राईव्ह.
  • आकार अभ्यासक्रमावर आधारित कृती पुस्तिका


क) वृद्धी संनियंत्रणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे अथवा दुरुस्ती करून देणे

  • प्रौढांसाठी वजनकाटा
  • लहान बालकांचे वजन मोजण्याचा वजनकाटा
  • उंची मोजण्याचे साधन
  • तान्ह्या बाळाची उंची मोजण्याचे साधन
  • शासनमान्य ग्रोथ मॉनिटरींग चार्ट छुपाई

ड) प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम

  • किशोरवयीन मुलींकरिता आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सहाय्य
  • पोषण व पूर्वशालेय शिक्षणातील तज्ञ संस्था यांना शासनाच्या मान्यतेने अथवा शासन ज्यांना प्राधिकृत करेल त्यांच्या मान्यतेने अंगणवाडी स्तरावर मुख्यसेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या प्रशिक्षणास सहाय्य करणे.

इ) आरोग्य तपासणी व सुविधा

  • अंगणवाडी लाभार्थी (उदा. बालके, गरोदर महिला इ.) यांचेकरिता स्थानिक पातळीवर वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे अथवा आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे.
  • अतितीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता वैद्यकीय सल्ल्याने सहाय्य पुरविणे.

ई) इतर सहाय्य

  • अंगणवाडी केंद्रांच्या स्थानिक गरजा व आवश्यकतेच्या अनुषंगाने सुविधा सहाय्य देणे.
  • बालकांना नैसर्गिक आहार (उदा. केळी व अंडी) उपलब्ध करून देणे.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "लोकसहभागातून राबविणार अंगणवाडी दत्तक धोरण" (इंग्रजी भाषेत). 2022-10-04. 2023-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-01-11 रोजी पाहिले.
  2. ^ वृत्तसेवा, प्रभात (2022-10-10). "राज्यात अंगणवाडी दत्तक योजना". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2023-01-11 रोजी पाहिले.