अँतोनियो मेउच्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंतोनियो मेउच्ची

जन्म १३ एप्रिल १८०८ (1808-04-13)
फ्लोरेन्स, इटली
मृत्यू १८ ऑक्टोबर, १८८९ (वय ८१)
स्टेटन आयलंड, न्यू यॉर्क, अमेरिका
निवासस्थान स्टेटन आयलंड
नागरिकत्व इटालियन
कार्यक्षेत्र संदेश यंत्रे

आंतोनियो सांती ज्युझेप्पे मेउच्ची (इटालियन: Antonio Santi Giuseppe Meucci; १३ एप्रिल १८०८ - १८ ऑक्टोबर १८८९) हा एक इटालियन शास्त्रज्ञ व संशोधक होता. इ.स. १८०८ साली इटलीच्या फ्लोरेन्स शहरात जन्मलेला मेउच्ची १८५० सालापासून मृत्यूपर्यंत न्यू यॉर्क शहराच्या स्टेटन आयलंड येथे वास्तव्यास होता. संशोधन व नवी उपकरणे शोधण्याची आवड असलेल्या मेउच्चीने १८५७ साली विद्युत चुंबकीय शक्तीवर चालणारे जगातील पहिले दळणवळण यंत्र बनवले. इ.स. १८७१ मध्ये त्याने हे यंत्र पेटंट करण्यासाठी अर्ज दाखल केला परंतु त्याच्या संशोधन अर्जामध्ये विद्युतचुंबकाचा उल्लेख नसल्यामुळे ह्या पेटंटला फारसे वजन मिळाले नाही. १८७६ साली अमेरिकन पेटंट कार्यालयाने अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ह्या ब्रिटिश शोधकाला दूरध्वनी निर्माण केल्याचे पेटंट मंजूर केले. आजही जगातील पहिला दूरध्वनी कोणी शोधून काढला ह्याबाबत अनेक मतभेद आहेत.

मेउच्ची प्रसिद्ध इटालियन सेनापती व राष्ट्रीय चळवळ पुरस्कर्ता ज्युझेप्पे गारिबाल्दी ह्याच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता.

बाह्य दुवे[संपादन]