Jump to content

अँजिओग्राफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेंदुचे ॲंजिओग्राफी चित्र

अँजिओग्राफी ही मानवाच्या वैद्यकीय तपासण्यांमधील एक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.

इतिहास[संपादन]

या पद्धतीचा प्रथमतः पोर्तुगीज चिकित्सक इगास मोनिज यांनी मेंदूच्या विविध आजार व रक्तवाहिन्यांतील दोष शोधण्यासाठी वापर केला. त्यांनी लिस्बन मध्ये पहिली इ.स. १९२७ला ॲंजिओग्राफी केली. रियनार्डो सिद डोस यांनी इ.स. १९२९ पहिला अ‍ॅओर्टोग्राम काढला. इ.स. १९५३ साली सेल्डिंगर टेक्निकच्या साहाय्याने अवयवांची ॲंजिओग्राफी करणे सोपे झाले.

तपासणी पद्धती[संपादन]

ॲंजिओग्राफीसाठीची यंत्रणा

प्राथमिक तपासण्या पार पाडल्यावर ॲंजिओग्राफीसाठी रुग्णाला रुग्णालयात भरती केले जाते. त्याच्या जांघेतील शिरेतून किंवा हातातील शिरेतून ॲंजिओग्राफी कॅथेटर टाकला जातो. तो संबंधीत रक्तवाहिनी पर्यंत जातो. हा कॅथेटर स्क्रीनवर डॉक्टरांना दिसतो. तो योग्य ठिकाणी पोहोचल्यावर त्यातून क्ष-किरणांत दिसणारा डाय सोडला जाते. हा डाय अपारदर्शक असतो. हा डाय सोडल्याबरोबर तो रोहिणीतून जातो.. रक्तवाहिनी दिसण्यासाठी वेगवेगळी छायाचित्रे सीटी स्कॅन किंवा एमआरआय द्वारे घेतले जातात या प्रवाहात कुठेही अडथळा असल्यास तो भाग निमुळता होतो. त्यावरून अडथळा कुठे आहे ते कळते व तो किती टक्के आहे ते ही मोजता येते.

हे सुद्धा पहा[संपादन]