लापतेव समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियाच्या नकाशावर लापतेव समुद्र
ह्या परिसरात आढळणारे हिमघुबड

लापतेव समुद्र (रशियन: мо́ре Ла́птевых) हा आर्क्टिक महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र सायबेरियाच्या उत्तरेस स्थित आहे. लापतेव समुद्राला पश्चिमेस सेवेर्नाया झेम्ल्या हा द्वीपसमूह कारा समुद्रापासून तर पूर्वेस नवीन सायबेरियन द्वीपसमूह पूर्व सायबेरियन समुद्रापासून वेगळा करतो.

लेना ही सायबेरियन नदी लापतेव समुद्राला मिळणारी सर्वात मोठी नदी आहे.