य.गि. महाजन
Appearance
यशवंत गिरधर महाजन (मे १२, इ.स. १९४१ - हयात) हे मराठी-भारतीय राजकारणी आहेत. पुणे विद्यापीठातून बी.एड. केलेले महाजन हे व्यवसायाने शिक्षक आहेत. हे भारतीय जनता पक्षाकडून जळगांव लोकसभा मतदारसंघातून १९९९ सालच्या तेराव्या व २००४ सालच्या चौदाव्या लोकसभेवर निवडून गेले होते.[१]. नॉयडामधल्या कोब्रापोस्ट नामक प्रसारमाध्यम कंपनीने एका छुप्या कारवाईदरम्यान ते ३५,००० रुपयांची लाच घेत असताना त्यांची ध्वनि-चित्रफीत काढली. ही फीत आज तक या हिंदी दूरचित्रवाहिनीने ऑपरेशन दुर्योधन या कार्यक्रमात दाखवली. [२] हे पैसे त्यांनी लोकसभेत विशिष्ट प्रश्न विचारण्यासाठी घेतल्याचा आरोप होता.
संदर्भ
[संपादन]- ^ "भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील अधिकृत अल्पचरित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ बहल,अनिरुद्ध. "ऑपरेशन दुर्योधन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |