Jump to content

कर्नाटक रक्षणा वेदिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नाटक रक्षणा वेदिके

(कन्नड: ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ) कन्नड भाषा, लोक आणि कर्नाटक यांच्या हक्कांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व संवर्धनासाठी लढणारी एक संस्था. अध्यक्ष: नारायण गौडा. ३६८४ शाखा व ४.६ लाख सभासद.

कार्य

[संपादन]

१. महाराष्ट्रात समाविष्ट होण्याचा ठराव केल्याबद्दल ११ नोव्हेंबर २००५ साली बेळगावचे महापौर विजय मोरे यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच कर्नाटक बंद घडवून आणला.
२. कावेरी पाणी प्रश्नाबाबत तामिळनाडूला केंद्राने झुकते माप दिल्याच्या निषेधार्थ १२ फे २००७ रोजी कर्नाटक बंद घडवून आणला. ४ मे २००७ रोजी २०,००० कन्नडिगांनी नवी दिल्लीत निदर्शने केली
३. कर्नाटकात स्थानिक कन्नड लोकांना खासगी, सरकारी नोकऱ्यांमध्ये, रेल्वेमध्ये प्राधान्य मिळवून देण्यासाठी कार्यरत.
४. राज्यात सर्वत्र कन्नड भाषेचा वापर होण्यासाठी कार्यरत. फक्त हिंदी किंवा इतर भाषेतील फलकांवर काळे फासण्यात पुढाकार.
५. केंद्र सरकारच्या शिक्षण, प्रसारमाध्यमे, मनोरंजन, राज्यकारभार इ. मधील हिंदी भाषाच्या सक्तीमुळे, ’भारतीय असण्यासाठी हिंदी बोलता आलेच पाहिजे’ ही भावना वाढीस लागते आणि हे भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध असल्याने ही संस्था १४ सप्टें हा दिवस "हिंदी सक्ती विरोधी दिन" म्हणून साजरा करते.

संकेतस्थळ

[संपादन]

http://www.karnatakarakshanavedike.org/