Jump to content

लेस्बियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समलैंगिक स्त्रियांना लेस्बियन (इंग्लिश: Lesbian) म्हणले जाते. लेस्बियन हा शब्द समलैंगिक समागम करणाऱ्या स्त्री अथवा स्त्रियांना उद्देशून नाम स्वरूपात (उदा. ती लेस्बियन) किंवा एखाद्या गोष्टीचे समलैंगिक स्वरूप दाखवण्यासाठी विशेषण (उदा. लेस्बियन जोडपे) म्हणून वापरला जातो. स्त्री समलैंगिकता जरी पुराणकाळापासून अस्तित्वात असली तरी, लेस्बियन शब्दाचा 'समलैंगिक स्त्री' हा अर्थ २०व्या शतकात प्रचलित झाला. 'लेस्बियन' शब्दाचे मूळ प्राचीन ग्रीक इतिहासातील इ.स.पूर्व सन ६व्या शतकातील सॅफो कवयित्रीचे राहण्याचे ठिकाण असलेल्या 'लेस्बोस' ह्या बेटाच्या नावात आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पुरुष समलैंगिकता समाजात एक मानसिक रोग म्हणून गणली जात असे व वैद्यकीयदृष्ट्या देखील पुरुष समलैंगिकतेची गणना अनैसर्गिक मानसिकतेमध्ये होत असे. त्यामानाने स्त्री समलैंगितेच्या विषयाबद्दल तोपर्यंत फारशी कधी चर्चा झाली नव्हती. जर्मन रिचर्ड व्हॉन क्राफ्ट एबिंग ह्या आणि ब्रिटिश हॅवलॉक एलिस ह्या दोन मानसरोग शास्त्राज्ञांनी सर्वप्रथम स्त्री समलैंगिकतेची वैद्यकीय लिखाणात चर्चा केली.

वैद्यकीयदृष्ट्या, लेस्बियन असणे हा रोग किंवा मानसिक विकृती नाही. पुरुष समलैंगिकतेप्रमाणेच, स्त्री समलैंगिकता ही एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये जन्मतःच असते हे वैद्यकिय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. (जरी अश्या वेगळ्या जडणघडणीचे मूळ ठोसपणे उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आलेले नाही.)

हे सुद्धा पहा

[संपादन]