Jump to content

वावळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव होलोप्टेलिआ इन्टेग्रिफोलिआ(Holoptelea integrifolia) असे आहे . याचे कूळ अल्मेसी आहे .

मराठी नाव

[संपादन]

वावळा

शास्त्रीय नाव- Holoplelea integrifolial ( होलोप्टेलिआ इंन्टेग्रिफोलीया )

कुळ UImaceae ( अल्मेसी )

माहिती

[संपादन]
Gardenology.org-IMG 8115 qsbg11mar

पूर्ण पानांनी भरलेला वावळा आणि पानं अजिबात नसताना पूर्ण फळांनी भरलेला वावळा दोन्हीही दृश्य सारखीच आकर्षक असतात. ४०ते ५० फुट उंची गाठणारा हा जंगलात वाढणारा वृक्ष पानगळी वृक्ष आहे. गडद हिरव्या गुळगुळीत पानांनी भरलेला हा वृक्ष डिसेंबर महिन्यात पानं गळतो. निष्पर्ण वृक्षावर स्त्रीपुष्प आणि नरपुष्पाचे झुबके दिसू लागतात आणि फेब्रुवारी महिन्यात झाड पोपटी रंगाने न्हाऊन निघतं. सारं झाड या फळांनी भरभरून झुलू लागतं. रुपयाच्या नाण्याच्या आकारापेक्षा किंचित - सूतभर लहान असलेली ही फळं बरेच दिवस अशीच हिरवी राहतात. झुळुकीने मिळालेल्या हेलाकाव्यांवर फडफड नाचत राहतात. सुकतात तेव्हा प्रथम पिवळट, मग भुरकट तपकिरी होतात. आणि मग मात्र झाडाची साथ सोडतात. पण तोवर पुन्हा एकदा वावळा पानांचं वस्त्र चढवू लागलेला असतो. एकामागोमाग एक वाऱ्यावर गिरक्या घेत सैरावैरा चाहुदिशा पसरणाऱ्या या फळांच्या उड्डाणाचं दृश्य कधीतरी अवश्य पहावं असं.

संदर्भ

[संपादन]

वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक