नाथ पै

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅरिस्टर नाथ बापू पै (जन्म : वेंगुर्ला, २५ सप्टेंबर १९२२; - १८ जानेवारी १९७१) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे.

नाथ पै हे मराठी-इंग्रजीखेरीज फ्रेंच-जर्मन बोलत. त्यांची पत्नी ऑस्ट्रियन होती.

स्मारक[संपादन]

पुणे शहरात राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरुजी स्मारक येथे नाथ पै यांच्या स्मरणार्थ ’बॅ. नाथ पै रंगमंच’ नावाचे छोटे नाट्यगृह उभारले आहे. त्याचे उ‌द्‌घाटन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी २ एप्रिल २०१३ रोजी केले.

    नाथांच्या कर्मभुमित म्हणजे तत्कालीन राजापूर मतदारसंघातील मालवण तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून ४०वर्षां पुर्वी ‘बॅ.नाथ पै सेवांगण ही सेवाभावी संस्था उभारून नाथांच्या विचारांचे उचित स्मारक निर्मिले आहे.सेवांगणच्या अंतर्गत साथी दादा शिखरे सभागृह,एस् एम् जोशी संकुल,मधुबन अतिथी गृह,कृष्णाई भोजनकक्ष अश्या वास्तू उभारण्यात आल्या असून कौटुंबिक सल्ला केंद्र,साने गुरुजी वाचन मंदिर,साथी ज्ञानेश देऊलकर जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र,बाल विकास प्रकल्प,प्रा.मधु दंडवते सेवानिधी,साथी बबन डिसोजा शिक्षण निधी, साथी मधु वालावलकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ,बॅ.नाथ पै पुरस्कार,मालवणी बोली भाषा संरक्षण,संगोपन,संवर्धन केंद्र,मोफत अन्नछत्र हे आणि असे अनेकविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

नाथ पै यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • लोकशाहीची आराधना

चरित्रग्रंथ[संपादन]

  • महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार बॅ.नाथ पै. (लेखक : जयानंद मठकर) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)