सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो
Appearance
पोंबालचा पहिला मार्के, सेबास्तियाओ होजे दि कारवाल्हि इ मेलो (पोर्तुगीज: Sebastião José de Carvalho e Melo; १३ मे १६९९, लिस्बन - ८ मे १७८२, पोंबाल) हा एक प्रभावी पोर्तुगीज राजकारणी व २ ऑगस्ट १७५० ते ४ मार्च १७७७ दरम्यान पोर्तुगालचा पंतप्रधान होता. त्याच्या २७ वर्षांच्या कार्यकाळामध्ये पोंबालने पोर्तुगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. १७५५ सालच्या लिस्बनमधील भूकंपानंतर हाती घेतलेल्या जलद बचावकार्याकरिता तो वाखाणला जातो.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत