आकाश (टॅबलेट)
आकाश हा ॲन्ड्रॉइड प्रणालीवर चालणारा एक टॅबलेट संगणक आहे. डेटाविंड ह्या मॉंत्रियाल-स्थित कंपनीने ह्याचे डिझाईन तयार केले असून त्याचे उप्तादन भारतात केले जाईल. ह्या टॅबलेटचा वापर व्हिडियो पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, पुस्तके व मासिके वाचण्यासाठी तसेच इंटरनेट ब्राउझिंगसाठी करता येईल. अंदाजे ६० अमेरिकन डॉलर किंमत असलेला व यूबीस्लेट ७ ह्या नावाने विकला जाणारा आकाश हा सर्व आधुनिक सुविधा असणारा जगातील सर्वांत स्वस्त टॅबलेट असेल. ह्या टॅबलेटचा उपयोग भारतभरातील २५,०००कॉलेजे व ४०० विद्यापीठे इ-शिक्षणासाठी करतील असा अंदाज केला गेला आहे. भारत सरकारने अंदाजे १ लाख आकाश टॅबलेट उपकरणे खरेदी केल्याचे वृत्त आहे.
हार्डवेर
[संपादन]- ७ इंच टचस्क्रिन
- दणकट बांधणी
- वायरलेस इंटरनेट
- हेडफोन जॅक
- २ युएसबी पोर्टस
- एआरएम आर्किटेक्चर प्रोसेसर
- २५६ एमबी मेमरी
सॉफ्टवेर
[संपादन]- ॲन्ड्रॉइड २.२
- आयआयटीने विकसित केलेली शैक्षणिक सॉफ्टवेर
शब्दोतिहास
[संपादन]ह्या टॅबलेट ला आकश हे नाव देन्या पूर्वी साक्शात हे नाव दिले गेले होते.आकश हे नाव सन्स्क्रुत शब्द ' आकाशा ' ह्या वरून घेतले गेले असुन ह्या शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत जसे की नभ,गगन.
विनिर्देश
[संपादन]विनिर्देश | आकाश | यूबीस्लेट 7+ |
---|---|---|
किंमत | २,५०० | २,९९९ |
मध्यवर्ती प्रक्रियन विभाग गती | ARM11, 366 MHz | ARM कोर्टेक्स-A8, 700 MHz |
रॅम | २५६ एमबी | २५६ एमबी[१] |
बाट्री | 2100 mAh | 3200 mAh |
ओपेरेटींग सिस्टीम | ॲन्ड्रॉइड 2.2 फ्रोयो | ॲन्ड्रॉइड 2.3 जिंजर्ब्रेड |
नेटवर्क | Wi-Fi | Wi-Fi, GPRS फोन नेटवर्क |
निर्माणाचे ठिकाण | भारत | भारत |
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "Aakash Tablet: UbiSlate Netbook: Datawind Ubislate". UbiSlate. Datawind.com. 2011-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-01-11 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- "डेटाविंड कंपनीचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "आकाश टॅबलेट संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-12-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "बुकिंग संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |