सिंफेरोपोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंफेरोपोल
Симферополь
Сімферополь
Ukraineमधील शहर


ध्वज
चिन्ह
सिंफेरोपोलचे Ukraineमधील स्थान

गुणक: 44°57′7″N 34°6′8″E / 44.95194°N 34.10222°E / 44.95194; 34.10222

देश युक्रेन ध्वज युक्रेन
विभाग क्राइमियाचे प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. १७८४
क्षेत्रफळ १०७ चौ. किमी (४१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१५० फूट (३५० मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,३७,२८५
  - घनता ३,१८३.२ /चौ. किमी (८,२४४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
अधिकृत संकेतस्थळ


सिंफेरोपोल (रशियन: Симферополь, युक्रेनियन: Сімферополь) हे पूर्व युरोपातील क्राइमिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मार्च २०१४ पासून क्राइमियाचे राजकीय अस्तित्व वादामध्ये असल्यामुळे येथे व सिंफेरोपोलवर सध्या रशियाचे अधिपत्य असले तरीही आंतरराष्ट्रीय समुदाय सिंफेरोपोलला युक्रेनमधील एक शहर मानतो. राजधानी असल्यामुळे सिंफेरोपोल क्राइमियाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

इ.स. १७८४ साली दुसऱ्या कॅथरिनच्या नेतृत्वाखालील रशियन साम्राज्याने क्राइमियावर अधिपत्य मिळवल्यानंतर ह्या शहराचे नाव सिंफेरोपोल असे ठेवण्यात आले. १८५४-५६ सालच्या क्राइमियन युद्धादरम्यान रशियन सैन्याचा एक प्रमुख तळ सिंफेरोपोलमध्ये होता. दुसऱ्या महायुद्धकाळात १ नोव्हेंबर १९४१ ते १३ एप्रिल १९४४ दरम्यान सिंफेरोपोल नाझी जर्मनीच्या ताब्यात होते. नाझींनी येथील २०,००० पेक्षा अधिक (प्रामुख्याने ज्यू धर्मीय) नागरिकांची हत्या केली होती. २६ एप्रिल १९६४ रोजी सोव्हिएत संघाने क्राइमिया व सिंफेरोपोलची अखत्यारी रशियाकडून युक्रेनकडे सुपुर्त केली.

मार्च २०१४ मध्ये सिंफेरोपोलमध्ये घेण्यात आलेल्या एका जनमतामध्ये बहुसंख्य नागरिकांनी युक्रेनऐवजी रशियामध्ये सामील होण्यास पसंदी दाखवली. २१ मार्च २०१४ रोजी सिंफेरोपोल क्राइमियाचे प्रजासत्ताक ह्या रशियाच्या प्रशासकीय विभागाची राजधानी बनवली गेली.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: