चर्चा:सोरठी सोमनाथ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोरठ हे सौराष्ट्रातल्या एका जिल्ह्याचे नाव आहे. या जिल्ह्याला हल्ली जुनागड जिल्हा म्हणतात. मल्लिकार्जुन आणि सोरठी सोमनाथाचे अपवाद वगळता इतर ज्योतिर्लिंगाच्या नावात स्थळाचे उल्लेख नाहीत, मग या दोघांचा अपवाद का?...J १८:३७, २९ जुलै २०११ (UTC)

काही हरकत नाही नाव बदल करावा यास अनुमोदन आहे निनाद २२:३१, २९ जुलै २०११ (UTC)

या लेखात खरोखरच इतक्या सार्या साचांची आवशकता आहे का ? हिंदू धर्मातील सोळा संस्कार पासून भारतीय महिने आणि हिंदू काल गणना पर्यत ? मला असे वाटते कि संदर्भितच साचे द्यावे आणि अनावश्यक साच्यांना येथून फाटा द्यावा. तीच तीच माहिती फिरून फिरून अनेक लेखात सम्बंध नसतांना देण्याचे काय अव्चीत्य. राहुल देशमुख १८:५१, २९ जुलै २०११ (UTC)

तसे एकमेकांशी फारसा सबंध नसणारे साचे पानावरून काढले पाहिजेत. पण त्यातील लेख हे दुर्लक्षित आहेत/होते. काही काळ हे साचे नजरेसमोर राहिले तर भर घालणे होत राहील. यथावकाश त्यात मजकूर आल्यावर, त्यांना तेथून काढावे ही मी विनंती करेनच. सध्या हिंदू धर्म विषयक पाने एकत्र दिसावीत असा प्रयत्न आहे म्हणून साचे बनवून सर्वत्र टाकत आहे. कळावे निनाद २२:३१, २९ जुलै २०११ (UTC)

गिचडी नको, सुव्यवस्थापन हवे[संपादन]

नमस्कार कट्यारे असंबद्ध दुवे आणि मार्गक्रमण साचे जोडल्यामुळे मुख्य नामविश्वातील पानांची विश्वकोशीय गुणवत्ता खालावते. मुख्य नामविश्वातील पानावर शीर्षकविषयाबद्दल संतुलित व नेमकी माहिती आणि चोख मांडणी असणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्य नामविश्वातील पानांवर गिचडी करायला नको. तुम्ही म्हणता तसा हिंदू धर्मविषयक पानांच्या विस्ताराचा मुद्दा ग्राह्य असला, तरीही त्यासाठी विकिपीडिया:चरित्र प्रकल्प, विकिपीडिया:विकिप्रकल्प पक्षी या विकिप्रकल्पांप्रमाणे हिंदूधर्मविषयक प्रकल्प राबवण्याचा पर्याय योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५८, ३० जुलै २०११ (UTC)