Jump to content

विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प वनस्पती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सहभागाने मराठी विकिपीडिय़ाच्या वनस्पती दालनास आरंभ झाला आहे ही फार

आनंदाची गोष्ट आहे. गेला महिनाभर मी इतर उपद्व्यापात गुंतल्यामुळे सहभागी झालो नाही याबद्दल क्षमस्व. परंतू ह्या साठी उत्तम मराठी साहित्य की इन्‌ करण्याचे काम विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थिनींच्या मदतीने सुरू केले आहे. ते साहित्य आता हळू हळू उपलब्ध होऊ लागेल व ते वापरून या कामाला वेग आणता येईल. आतापर्यंत सुचवलेले वर्गीकरण वगैरेत काही बदल करणे इष्ट आहे. थोड्याच दिवसांत मी काही सुचवेन. तोवर आपण उत्साहाने सुरू केलेले चालू द्यावे.

नमस्कार, मी व प्राजक्ता आता वनस्पती दालनात प्रवेश करून काही सूचना

मांडण्यास सुरवात केली आहे. कृपया विकिपीडिया:वनस्पती/सूचना (विभाग) संपादन मध्ये जाऊन आम्ही वनस्पतीच्या व्याख्येत सुचवलेला बदल पहावा. आम्ही व्याख्येचे संपादन करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो अयशस्वी ठरला. माहितगारांनी हे संपादन करावे ही विनंती. एक अडचण परिभाषेची आहे. यासाठी आम्ही आतापर्यंत वापरलेल्या विविध पारिभाषिक शब्दांचे संकलन सुरू केले आहे. इंग्रजी विक्शनरीत ते भरण्यास प्रारंभ करत आहोत.

1) पारिभाषिक शब्दांचे संकलन

खालील शब्दकोशांतील सुमारे ८०० वनस्पतिशास्त्रीय शब्दांसाठीचे पारिभाषिक शब्द व या शब्दांच्या इंग्रजीतील व्याख्या यांचे संकलन पुरे होत आले आहे. 1. N.B.Ranade (1916 onwards) The Twentieth Century English- Marathi Dictionary in two volumes. Shubhada- Saraswat Prakashana, Pune 411005 2. य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश 3. Raghu Vira. 1948 (?) Great English- Indian Dictionary; also Elementary English- Indian Dictionary of Scientific Terms, International Academy of Indian Culture, Nagpur 4. Central Hindi Directorate 1962: A consolidated glossary of technical terms. पारिभाषिक शब्द संग्रह 5. Central Hindi Directorate 1964 : विज्ञान शब्दावली 6. विश्वकोश खंड १८: पारिभाषिक शब्द 7. वनस्पतीशास्त्र परिभाषा कोश - ले. म. वि. आपटे 8. परिभाषा वानसशास्त्र - पुणे विद्यापीठ 9. नागपूर विद्यापीठाची परिभाषा (सावंतांच्या पुस्तकात आहे) 2) पुस्तकातील मजकुराचे युनिकोडमध्ये ग्रथन खालील वनस्पतिशास्त्रीय पुस्तकांचे विद्यार्थी सहाय्यक समितीच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा लाभ घेऊन युनिकोडमध्ये ग्रथन करण्यास आरंभ झाला आहे, व हे व्यवहार्य आहे हे सिद्ध झाले आहे. i) आपटे: वनश्री सृष्टी खंड १ व २ ii) देसाई: ओषधिसंग्रह iii) नाइक: महाराष्ट्र गॅझेटियर: वने व वनस्पती iv) सावंत: दिव्य वनौषधि

3) मराठी व इंग्रजी विक्शनरीत शब्द भरणे निवडक वनस्पतिशास्त्रीय शब्द मराठी व इंग्रजी विक्शनरीत भरण्यास सुरुवात केली आहे. ह्यासाठी दाते आणि कर्वे यांचे महाराष्ट्र शब्दकोश व महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश वापरत आहे. Access Databaseचा वापर करून विक्शनरीला अनुरूप असे सुव्यस्थित data entry forms तयार केल्यास विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थ्यांमार्फत ह्या कामात मदत घेता येईल. अशा Databaseचे report हे विक्शनरीत तसेच्या तसे चिकटवता आले, तर काम फार सोपे होईल. ह्यासाठी यांनी सहाय्य देण्याची तयारी दर्शवली आहे. अशा शब्दांचा दुवा मराठी विकिपीडियातील लेखांना देण्यात येत आहे.

4) मराठी विकिपीडियात वनस्पतिशास्त्रीय लेख लिहिणे विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थ्यांनी युनिकोडमध्ये ग्रथित केलेल्या साहित्याचा वापर मराठी विकिपीडियात वनस्पतिशास्त्रीय लेख लिहण्यास आरंभ केला आहे. अशा लेखांत ज्या ज्या वनस्पतिशास्त्रीय पारिभाषिक शब्दांचा वापर होईल, त्या सर्व शब्दांना मराठी व इंग्रजी विक्शनरीत भरण्यात यावे, व लेखांत या शब्दांचा दुवा देण्यात यावा असा प्रयत्न केला जाईल. तसेच ह्या सर्व शब्दांचे जास्त तपशीलात विवरण करणारे लेख मराठी विकिपीडियात लिहले जावेत असाही प्रयत्न राहील.

-- With regards, Sincerely, कळावे, लोभ असावा, आपला स्नेहांकित, माधव Madhav Madhav Gadgil,

वनस्पतीची व्याख्या

[संपादन]

दालन:वनस्पती येथे वनस्पतीची व्याख्या 'हालचाल करु न शकणारे बहुपेशीय सजीव. वनस्पतींमध्ये झाडे, झुडुपे, वेली, शेवाळे व कवक यांचा समावेश होतो.' अशी दिली आहे.परंतु स्पॉंज सारखे प्राणीही हालचाल करु न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. या खेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही. तेव्हा वनस्पतीची व्याख्या 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज्‌‍ सृष्टीतील सजीव:(१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशी भित्ती (४) पेशींमध्ये केन्द्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतू एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, धरून ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.' अशी करावी. वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो.

Madhav.gadgil, चर्चा, योगदान|

नमस्कार, जीवचौकट साच्यात वापरलेल्या पारिभाषिक शब्दांत सुधारणा करता येईल. प्राजक्ताच्या माहितीसाठी तिने विकिपीडिया:वनस्पती पानावर जाऊन जीवचौकट जोडा हे पहावे असे मी सुचवत आहे. आम्हा दोघांनाही यात अजून अडच्णी येत आहेत. आपल्याला खालील शब्द तपासून पहायला हवे: जीवचौकट | color = | नाव = | स्थिती = | स्थिती_प्रणाली = | स्थिती_संदर्भ = | fossil_range = | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | चित्र२ = | चित्र२_रुंदी = | चित्र२_शीर्षक = | virus_group = | domain = | domain_authority = | superregnum = | superregnum_ authority = | regnum = | regnum_authority = | subregnum = | subregnum_authority = | unranked_phylum = | unranked_phylum_ authority = | superdivisio = | superdivisio_ authority = | superphylum = | superphylum_ authority = | divisio = | divisio_authority = | वंश = | वंश_अधिकारी = | subdivisio = | subdivisio_authorit y = | subphylum = | subphylum_authority = | infraphylum = | infraphylum_ authority = | microphylum = | microphylum_ authority = | nanophylum = | nanophylum_authorit y = | unranked_classis = | unranked_classis_ authority = | superclassis = | superclassis_ authority = | जात = | जात_अधिकारी = | पोटजात = | पोटजात_अधिकारी = | infraclassis = | infraclassis_ authority = | unranked_ordo = | unranked_ordo_ authority = | magnordo = | magnordo_authority = | superordo = | superordo_authority = | वर्ग = | वर्ग_अधिकारी = | उपवर्ग = | उपवर्ग_अधिकारी = | infraordo = | infraordo_authority = | parvordo = | parvordo_authority = | zoodivisio = | zoodivisio_authorit y = | zoosectio = | zoosectio_authority = | zoosubsectio = | zoosubsectio_ authority = | unranked_familia = | unranked_familia_ authority = | superfamilia = | superfamilia_ authority = | कुळ = | कुळ_अधिकारी = | उपकुळ = | उपकुळ_अधिकारी = | supertribus = | supertribus_ authority = | tribus = | tribus_authority = | subtribus = | subtribus_authority = | जातकुळी = | जातकुळी_अधिकारी = | जातकुळी2 = | जातकुळी2_अधिकारी = | subgenus = | subgenus_authority = | sectio = | sectio_authority = | series = | series_authority = | species_group = | species_group_ authority = | species_subgroup = | species_subgroup_ authority = | species_complex = | species_complex_ authority = | जीव = | जीव_अधिकारी = | subspecies = | subspecies_authorit y = | type_strain = | diversity = | diversity_link = | बायनॉमियल = | बायनॉमियल_अधिकारी = | ट्रायनोमियल = | ट्रायनोमियल_अधिकारी = | type_species = | type_species_ authority = | subdivision = | subdivision_ ranks = | आढळप्रदेश_नकाशा = | आढळप्रदेश_नकाशा_रुंदी = | आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक = | बायनॉमियल2 = | बायनॉमियल2_अधिकारी = | आढळप्रदेश_नकाशा2 = | आढळप्रदेश_नकाशा2_रुंदी = | आढळप्रदेश_नकाशा2_शीर्षक = | बायनॉमियल3 = | बायनॉमियल3_अधिकारी = | आढळप्रदेश_नकाशा3 = | आढळप्रदेश_नकाशा3_रुंदी = | आढळप्रदेश_नकाशा3_शीर्षक = | बायनॉमियल4 = | बायनॉमियल4_अधिकारी = | आढळप्रदेश_नकाशा4 = | आढळप्रदेश_नकाशा4_रुंदी = | आढळप्रदेश_नकाशा4_शीर्षक = | synonyms = }}




en:Wikipedia talk:WikiProject Plants