Jump to content

सदस्य:Mahitgar/मनुष्य जन तो तेने कहिए,जे पीड़ पराई जाणे रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनुष्य जन तो तेने कहिए, जे पीड़ पराई जाणे रे |

पर दु:खे उपकार करे तोये , मन अभिमान न आणे रे |

सकल लोकमां सहुने वन्दे , निंदा न करे केनी रे|

या पाना बद्दल भूमिका[संपादन]

सदस्यांना वेळोवेळी दिलेली उत्तरे विखूरली जातात ,क्वचीत विषयांतरे होतात सहाय्य पानांचे दुवेही बदलले जातात,क्वचीत सदस्यांचे शंका समाधान पूर्ण झालेले नसते तर कधी अभिनिवेशाच्या भरात ऐकुन न ऐकल्या सारखे होते, आणि काही प्रश्न पुन्हा येरे माझ्या मागल्या पद्धतिने पुन्हा पुन्हा समोर येतात तर मला एका दमात लेखन करून होईलच असे नसते या दृष्टीने मी हे पान बनवले आहे. इतर सदस्य माझ्या येथील दृष्टिकोणांबद्दल इतरत्र चर्चा करू शकतात.येथे मात्र केवळ मीच लेखन करेन इतरत्र कुणी माझ्या दृष्टीकोणांबद्दल चर्चा केल्यास त्याचे दुवे आपण या पाना खाली इतरचर्चांचे दुवे विभागात देऊ शकाल.

लेखन अपूर्ण[संपादन]

जिथे सर्वसाधारण मनूष्य स्वत:बद्दलच विचार करतो आणि दुसऱ्यांच्या वेदना समजावून घेण्याचे टाळतो अशा जगात ....

(नरसी मेहता १४१४-१४६८ गुजरात ) यांच्या मूळ रचनेत बदल करून "मनुष्य जन तो तेने कहिए,जे पीड़ पराई जाणे रे" मध्ये टाकलेला मनुष्य शब्द खटकतो का ? आणि मुख्य म्हणजे या सगळ्या कवित्वाचा विकिपीडियाशी काय संबंध ? स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधींच्या प्रार्थनेत वैष्णव जन तो तेने कहिए, जे पीड़ पराई जाणे रे चा समावेश नेमका का झाला ते माहित नाही, पण वकिली करून पैसे कमावण्या करता आफ्रीकेत गेलेल्या गांधींनी त्यांच्याकडे आलेल्या केसेस कोर्टाबाहेरच दोन्ही बाजूत समझोते घडवून सोडवल्या , हे करताना दोन्ही बाजूंना गांधींनी कदाचीत दोन्ही बाजूच लक्ष स्वत:च्याच वेदना कोंबाळण्या पासून समोरच्या व्यक्तीच्या वेदने कडे नेल असेल आणि त्या वेळी वैष्णव जन मधील 'पीड़ पराई जाणे रे' चा मंत्र त्यांना उपयोगी पडला असेल का ?

वोडाफोनच्या टिव्ही कमर्शियल मध्ये एका छोट्याशा मुलीला एक छोट कुत्र्याच पिल्लू हळूच एखादी मदत देऊन जात.समोरच्याची गरज ओळखून तस एकमेकांना मदत करत पुढे जाण विकिपीडिया संस्कृतीत अभिप्रेत असत. विकिपीडिया सहमतीने चालतो.झालेल्या सहमती याच पुढची चर्चा होईपर्यंत पुढचे लेखन संकेत असतात.मराठी विकिपीडियात झालेल्या विवीध चर्चांवर बेतून, प्रगत शोध वापरून सहाय्य पाने बनवण्यात कुणीतरी पुढाकार घेणे अभिप्रेत असते. विकिपीडियावर विकिपीडियाबद्दल काहीच माहिती नसलेल्या व्यक्तीने अचानक संपादन करण्यास घेतल्यास त्याला कमीत कमी वेळात योग्य सहाय्य/मार्गदर्शना पर्यंत व्यक्ती लवकरात कसे पोहोचेल ह्या करता सर्वच जाणत्या सदस्यांनी पुढाकार घेण अभिप्रेत असत.

नवीन येणाऱ्या सदस्यास अमूक एका ठिकाणी नियमांची यादी आहे (मग ती मराठी /इंग्रजी विकिपीडिया किंवा मेटावर जाऊन ) त्यात Phd प्राप्त करा आणि मग इथे लिहा हे अभिप्रेत नसत. येणाऱ्या व्यक्तीने सरळ धीटपणे पुढाकार घेऊन मोकळ व्हाव , त्याच संपादन काही लेखन संकेतात बसत नसेल तर त्याच्याशी चर्चा पानावर जाऊन संवाद साधण लेखन संकेत आणि ते तसे का आहेत हे समजावून देणे , व्यक्ती चुकलीतरी ती का आणि कुठे चुकते आहे, एका पेक्षा अधीक व्यक्ती जर चुकत असतील तर नेमक अस का होत् आहे याचा अभ्यास करण्या करता चुकणाऱ्या व्यक्तीस आधी समजून घेणे स्वत:त किंवा ट्रॅफिक इंजिनीयरिंग करून /सिस्टीम मध्ये बदल करून प्रश्न सुटत असतील तर ते करण्यास प्राथमिकता देणे हि समजावण्याच्या आधीची पायरी असावी.समोरची व्यक्ती आणि समोरच्या व्यक्तिच्या त्रुटी समजून घेणे त्या करता पुन्हा पुन्हा संवाद साधणे जरुरी असते. त्या नंतर समजावणे या पायऱ्या आधी पूर्ण कराव्यात म्हणजे परस्पर समज देणे कमीत कमी व्हावे. एवढेकरूनही कुणी उत्पात चालू ठेवत असेल तर उत्पात योगदान कर्त्यांची यादीत नाव टाकून वेळोवेळी संपादनांवर लक्ष ठेवता येऊ शकते.मागच्या वेळी चुकला होता म्हणून या वेळी आणि पुढच्या सर्व वेळी चुकेलच असा पुर्वग्रह दुषीत दृष्टीकोण ठेऊ नये.

विकिपीडिया म्हणजे नियम तयार करण्याचा, आयात करण्याचा, कार्यक्रम किंवा चाकोरी नाही,अस्तीत्वात असलेले संकेतही काल परत्वे तपासून गरज संपलेले संकेत/नियम बाद करणे अभिप्रेत आहे. .इंटरनेटवरील मुक्तस्रोत ज्ञानकोशांची संकल्पना प्रसृत होतानाच त्यात No central control ची कल्पना अंतर्भूत होती आणि आहे.[१] . विकिमिडिया फाऊंडेशन चे स्वरूप केवळ एका फॅसिलिटेटरचेच असणे अभिप्रेत आहे. संस्थात्मक स्वरूप आल की नियमांची निर्मिती होतेच नियम तयार करणाऱ्यांचा(गटांचा) स्वत:चा वरचष्मा असतो.अशा वरचष्म्यांमुळे काही ना काही अंशी निष्पक्षपणा डायल्यूट होतो bias येतोच. निष्पक्षता कधीच पूर्ण अबसोल्यूट नसते निष्पक्षतेला वैविध्य असेल तरच निष्पक्षता निष्पक्ष ठरते. एका भाषेतील विकिपीडिया एखादा लेख एखाद्दा बाबतीत तेथील समुदायाच्या बायस मुळे निष्पक्ष नसेल तर त्यावर उतारा काय ? दुसऱ्या भाषेतील विकिपीडिया समुदाय वेगळा असेल , प्रत्येक प्रकल्पास संकेत/नियम बनवण्याच स्वातंत्र्य असेल अस नाही तर त्यांनी ते वापरणही अभिप्रेत आहे; एखाद्या प्रकल्पाने इतरांनी तयार केलेले नियम जसेच्या तसे तसे जिथे आयात केले तिथे निष्पक्षतेतील diversity वैवीध्य संपल :( त्यामुळे गरजे पुरतेच संकेत/नियम निर्मिती करून गरज आहे तेवढ्यावेळा गरज आहे तेवढा काळच वापरावेत .एखाद्दा प्रकल्पात जेव्हा नवीन संकेतांची गरज भासेल तेव्हा त्यांनी सहमतीने शक्यतेथे नवे स्वतंत्र लेखन संकेत बनवणे अभिप्रेत आहे . इतर प्रकल्पातील अथवा मेटा सारख्या ठिकाणच्या उल्लेखांचे संदर्भ घेऊ नयेत असे नाही पण हे संदर्भ घेणे म्हणजे स्वतंत्र संकेत निर्मिती टाळत तशा इतर ठिकाणच्या नियमांची जशीच्या तशी अमंलबजावणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे स्विकारणे अभिप्रेत नाही.

केवळ परिक्षे पुरती प्रश्नोत्तरे पाठ करण्या करता देता आली तर पहा, अगदीच आवश्यक असेल तर शक्यतो मला तयार आहे ते वाचावयास द्या , तयार उपलब्ध आहेत ते वापरा त्यांची चिकित्सा करू नका आणि करण्यास सांगू नका , बाबा वाक्यम् प्रमाणम् हि प्रवृत्ती/(संस्कृती?) इतर क्षेत्रात भारतीय लोकात आहेच , तीच प्रवृत्ती ज्ञान क्षेत्रातही स्विकारून ज्ञानकोशाच्या पायाचाच संकोच होऊ देणे स्विकारायचे का ?

मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व सामान्य माणसालाही विवेक असू शकतो , मराठी भाषेस आणि भाषिकांना स्वत:ची ज्या काही प्रगल्भ वैचारीक संस्कृतीचे पाठबळ उपलब्ध असताना मराठी लोकांना त्यांच्या संस्कृउतीस पोषक संकेत नियम बनवण्यास द्यायचे का, तयार आहेत म्हणून दुसऱ्यांचे उतरवलेले कपडे चढवायचे ? बरे मराठी विकिपीडियाही तब्बल नऊ वर्षांचा दहा लाखा पेक्षा अधिक संपादने आणि २० हजाराहून अधिक नोंदणीकृत सदस्यांचा , दिवसा काठी पाऊणे दोनलाख भेटी मिळवणारा झाला आहे .आणि एवढे सारे करताना आम्हाला फाऊंडेशनच्या अत्यावश्य्क नियामांपलिकडे इंग्रजी विकिपीडिया अथवा मेटाचे नियम जसेच्या तसे न स्विकारता स्वत:ची धोरणे बनवून मार्गक्रमण करता आले आणि या टप्प्यावर पोहोचल्या नंतर इथल्या अनुभवावर आणि मराठी वैचारीक संस्कृतीच्या बळावर इतरांना जाऊन ज्ञान द्यायचे का ? जगातील लोकसंख्येनेच नव्हेतर साक्षरतेने इंटरनेटची चांगली पोहोच असलेल्या आख्या समूदायाचे भवितव्य दुसऱ्यांनी बनवलेल्या नियमांच्या दिमतीला टांगणीला लावायचे ? तैनाती फौजेचे नियम स्विकारल्या नंतर तैनाती फौजही स्विकारावी लागते(आपापसातील हेव्यादाव्यांपोटी व्यक्तिगत स्वार्थ आणि द्वेषा पोटी अनेक भारतीय राजे रजवाड्यांनी तैनाती फौजा आणि दिलेल्या भत्त्यांवर ऐश करण्यात मोठे भूषण मानले होते). असे करणे मराठी विकिपीडियाच्या प्रगतीचे लक्षण ठरणार आहे का अधोगतीचे ?

लोकशाही मिळालीतर स्वातंत्र्य कशाला हवे असाही काही प्रश्न महात्मा गांधींना विचारला गेला होता , त्यांनी त्याचे उत्तर मी कॉलनीचे, राज्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाचा भाग आहे इतर जगाशी संवाद संपर्क सहभाग करण्या करता माझ्या घराला खिडक्या दारे असतील पण माझे भिंती आणि छप्पर अस्लेले घर स्वतंत्र हवे माझ्या घराची मालकी माझ्या कुटुंबाकडे असावी असे काहीसे उत्तर दिले होते.अतीथीचे स्वागत करावे पण त्याच्या हातात घराची मालकी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देऊ नये पण या बाबतीत भारतीयांनी उलटा इतिहास पुन्हा पुन्हा गिरवण्याचा आगळा वेगळा इतिहास बनवला. लोकमान्य कदाचीत त्यामुळेच म्हणत 'समुदायाच मानस शास्त्र एक न उमगणार कोड आहे'.नरहर कुरूंदकर स्वातंत्र्य जन्मसिद्ध असत का ? स्वातंत्र्य जपण्याच्या संस्कृतीतून मिळणार संस्कृती सिद्ध असत असा प्रश्न उपस्थित करतात .

संशयाचे प्रमाण जेवणात मिठासारखे हवे , मीठ (संशय) जास्त होऊन जसे जेवण खारट करून घेऊ नये तसेच बिन मीठाचे जेवणही करू नये. विकिपीडियाची मुळे रुजवणाऱ्यां आमेरिकीजनांवर माझा अगदी ९८ टक्के विश्वास आहे पण तो ९८ टक्केच आहे. मी विकिपीडियावर काम करतो कारण अशाच प्रकाची कल्पक सुविधा इतर भारतीय वेबसाइट कडून मिळत नाही आणि हि सुविधा मराठी जनांना उपयोगी आहे एवढेच. अगदी गेल्या महिनाभरात भारताने तेल कुठून आयात करावे असे भारताच्या अंतर्गत कारभारात सल्ले देणाऱ्या महासत्तांनी त्यांच्या कंपन्यांनी उदाहरण एन्रॉननने दाभोळ प्रकल्प चालूही होण्याच्या आधि जनशिक्षणावर ६३ कोटी वगैरेहुन आधिक खर्च केला म्हणे,काही बाबतीत महासत्तांच्या गुप्तचर सस्थांचा इतिहासबद्दल चागंले रोचक , वस्तुनिष्ठ आणि डोळ्यात अंजन घालणारे विश्वकोशीय लेख निर्माण होऊ शकतात आपल्या कडे संदर्भा करता पुरेसे नसले तरी अमेरिकेकडून अन्न आयात विभाग वाचावा एकुणच गुप्तचर संस्था कोणती पातळी गाठतील याच्या मर्यादा समजणे सामान्य बुद्धीच्या अवाक्या बाहेरचेही असू शकते.

विकिपीडिया सारख्या प्रकल्पाच्या निर्मिती मागचे उद्देश शुद्ध असावेत हे मी ९८% पर्यंत गृहीत धरून चालतो पण जेव्हा मी न्यूट्रालिटी म्हणजे काय आणि स्वबुद्धी गहाण ठेऊन इतरांच्या व्याख्येतली न्युट्रॅलिटी वगैरे स्विकारावयास लागतो आणि दिमतीला तैनाती फौजेचे नियम आणि तैनाती फौज स्विकारतो तेथे एखाद्दा राष्ट्राचा संस्कृतीचा बौद्धीक ऱ्हासही होऊ शकतो. बाकी बेडूक ज्या दिशेने उडी मारतात त्याच दिशेने आम्ही मारतो म्हणत एखाद्दा सापळ्यात अख्खा बेडकांचा थवा सापडणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कुणाची ?कळपातल्या सर्व आणि प्रत्येक बेडकाची !

संदर्भ[संपादन]

इतर चर्चांचे दुवे[संपादन]