रयत शिक्षण संस्था
कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म : कुंभोज-कोल्हापूर, २२ सप्टेंबर १८८७ : निधन : ९ मे १९५९) यांनी काले या गावी ग्रामस्थांना सोबत घेऊन घटस्थापनेच्या दिवशी ४ ऑक्टोबर, इ.स. १९१९ या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२४ साली रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे स्थलांतरित झाले. या संस्थेची महाराष्ट्रात २०१७ साली. ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७ वसती गृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, ५ तंत्र विद्यालये, ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ८ डी.एड. महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेल्या मुलांसाठी ६८ वसतिगृहे, ८ आश्रमशाळा, ५८ आयटीआय व इतर. एकूण संस्था ६७९, एकूण विद्यार्थी सुमारे साडेचार लाख व सेवक १६,९४८ आहेत.कार्मावीरांचे लग्न त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाले.त्यावेळी त्यांचे वय १२ होते. त्यांचे माहेरचे नाव आदाक्का होते.त्यांचे माहेर कुंभोज पाटील हे त्यांचे आडनाव होते ते एक प्रतिष्ठीत घराणे होते.लग्नात त्यांनी लक्ष्मीबाईना १२० तोळे सोन्याचे दागिने केले होते.शिक्षण सोडल्यानंतर कर्मवीर कोरेगावला आले.त्यावेळी लक्ष्मीबाई वहिनी या नावाने ओळखल्या जात.याचवेळी कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली.घर पाहुणे आले असता लक्ष्मीबाईच्या समोर त्यांनी कर्मवीरांचा अपमान केला.तो भाऊरावांच्या जिव्हारी लागला.वहिनीचे डोळे भरले होते भाऊरावांना त्या जेवायला वाढत होत्या.त्यांच्या डोळ्यातला थेंब भाऊरावांच्या ताटात पडला.कर्मवीर जेवत्या ताटावरून उठले.त्यांनी मनाशी निश्चय केला.ते तडक कोरेगाव ते सातारा पायी चालत आले
त्यावेळी त्यांना एक कल्पना सुचली शिकवण्या घेण्याची.मग त्यांनी शिकवणी वर्ग सुरू केले हळू-हळू मुले वाढत गेली.महिन्याला त्यांना ९० ते ९५ रुपये मिळू लागले.लक्ष्मीबाईना सातारा येथे आणले.साताऱ्यात भाऊरावांना अण्णा पाटील म्हणून ओळखू लागले.
शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होवू शकणार नाही हे ओळखून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कमवा आणि शिका या मुल्मंत्रातून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यानी यशाची विविध शिखरे पादाक्रांत केली आहे
संस्थेची उद्दिष्टे
[संपादन]कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील काले या गावी सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 'रयत शिक्षण संस्था' या नावाने एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात यावी असा ठराव मांडला व तो एक मताने मंजूर झाला. ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वतःच्या मालकीची जमीन करणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित करत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेला 'रयत शिक्षण संस्था' हे नाव सार्थ वाटते.
खालील प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून रयत शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.
- बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
- मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
- निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
- अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे.
- एकीचे महत्त्व कृतीने पटवून देणे.
- सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
- बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
- कमवा आणि शिका .