शिवाजी द बॉस (चित्रपट)
Appearance
शिवाजी (द बॉस) [तमिळ: சிவாஜி The Boss] (प्रदर्शित : जून २००७) हा ए.व्ही.एम. स्टुडिओज यांनी निर्मित केलेला व श्री.एस.शंकर ह्यांनी दिग्दर्शित केलेला एक २००७ सालचा गाजलेला तमिळ चित्रपट आहे. रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) आणि श्रिया सरन ह्यांनी प्रमुख भूमिका केल्या असून सुमन, विवेक (हास्य /विनोदी कलाकार), रघुवरन ह्यांनी इतर भूमिका साकारल्या आहेत. हा व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपट असून ह्यास ए.आर.रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. परदेशातून परतलेल्या भारतीय नागरिकाची देशाबद्दल असेलेली तळमळ याबद्दलचा हा चित्रपट आहे.