Jump to content

तौलनिक राजकारण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तौलनिक राजकारण हा राज्यशास्त्राचा उपघटक आहे. ॲरिस्टॉटल हा या उपशाखेचा जनक ठरतो. तुलनात्मक अभ्यासाद्वारे प्रत्येक राज्यव्यवस्थेच्या वेगळ्या वैशिष्ट्यांची कार्यकारणमीमांसा शक्य होते. कोणत्याही राज्यपद्धतीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन तुलनेशिवाय होऊच शकत नाही. तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण ह्या काटेकोर दृष्टीने पाहिल्यास भिन्न भिन्न व्याप्ती असणाऱ्या संकल्पना आहेत. दुसरी संज्ञा अधिक व्यापक आणि पहिल्या संज्ञेला आपल्या कक्षेत सामावून घेणारी आहे.