Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २०१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झीरो ए.डी. हा एक विनामूल्य, मुक्त-स्रोत, अनेक प्लॅटफॉर्म असलेला वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे. हा खेळ सध्या विकसनशील अवस्थेत आहे व वाइल्डफायर गेम्स हे त्याचे विकासक आहेत. हा ऐतिहासिक युद्धे व प्राचीन अर्थव्यवस्था यांवरील खेळ असून यात ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या काळावर लक्ष केंद्रित केले आहे[][]. हा खेळ मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्सलिनक्स यावर खेळता येतो.[] हा खेळ विनामूल्य व मुक्त-स्रोत असून खेळाच्या इंजिनासाठी जीपीएल २+ हा परवाना तर खेळातील दृश्य व चित्रे यासाठी सीसी-बीवाय-एसए हा परवाना वापरण्यात आला आहे. हा खेळ २००० सालापासून विकसित होत आहे व त्याचे प्रत्यक्ष काम २००३ सालापासून सुरू झाले आहे. संपूर्ण आवृत्तीसाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही.[]

झीरो ए.डी. मध्ये वास्तव - काल डावपेच प्रकारातील खेळांचे तळ उभारणे, सैन्य प्रशिक्षित करणे, लढाई व तंत्रज्ञान शोध हे घटक आहेत. हा खेळ आर्थिक विकास व लढाया यांच्याशी संबंधित आहे. या खेळात प्रत्येक संस्क्रुतीसाठी विशिष्ट इमारती, सैनिक, नौका व युद्धनौका इत्यादी आहेत.

अनेक-खेळाडू एकाचवेळी खेळण्याची सुविधाही या खेळात उपलब्ध असून त्यामध्ये केंद्रीय सर्व्हरविरहित असलेले आंतरजाल वापरले जाते.

झीरो ए.डी. खेळाडूला अकरा प्राचीन संस्कृत्यांपैकी कोणतीही संस्कृती निवडण्याची मुभा देते. पुढच्या आवृत्त्यांमध्ये विकासकांनी जर्मेनिक, व्हॅन्डाल, हूण, डॅसियन, सर्मॅशियन, नंतरचे रोमन प्रजासत्ताक, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, सॅक्सन, पार्थियन साम्राज्य, गॉथ या संस्कृत्या उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.[]

पुढे वाचा... झीरो ए.डी.

  1. ^ http://www.haaretz.co.il/captain/spages/1182839.html
  2. ^ http://www.joystiq.com/2010/07/13/the-joystiq-indie-pitch-0-a-d/
  3. ^ http://www.thevarguy.com/2009/10/13/0-ad-promises-real-gaming-for-ubuntu/
  4. ^ http://geek-haven.com/2011/interview-wildfire-game/ [मृत दुवा]
  5. ^ http://play0ad.com/game-info/factions/